पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:31 PM2018-04-22T22:31:06+5:302018-04-22T22:31:06+5:30

जळके येथील स्थिती

Due to the lack of water, the 'jalyukt' is still useless | पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

Next
ठळक मुद्दे पुरेसा पाऊस झाल्यास विविध बांधांमधील पाणी पुरते एप्रिलपर्यंत गुरांसाठी पाणी मिळविण्याकरीता विहिर मालकाच्या शेतात मजुरी

सुशील देवकर
जळगाव : तालुक्यातील जळके येथे लोकसहभागातून तसेच शासनाकडूनही जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वीच लहान-मोठे ११ बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागीलवर्षी या परिसरात पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरणातून दरवर्षी ओव्हर-फ्लो होऊन येणारे पाणी आलेच नाही. त्यामुळे हे सर्वच बांध कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेद्वारे टंचाईशी लढा देण्याची घोषणाही जळके परिसरात पाऊसच न झाल्याने निरूपयोगी ठरली आहे.
लोकसहभागातून झाले होते काम
आर्ट आॅफ लिव्हिंग, जैन इरिगेशनचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व लोकवर्गणीतून बोढरे नाल्यावर (नदीवर) जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जैन इरिगेशनने ४५ दिवस पोकलॅण्ड मशीन मोफत दिले. तर आर्ट आॅफ लिव्हींगने डिझेलसाठी ५० हजार रूपये दिले. तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बोढरे नाल्यावर (नदीवर) ९, तसेच गलाटी नाल्यावर २ असे ११ लहान मोठे बंधारे बांधले होते. तसेच त्याच्या दुसऱ्या वर्षीही या बंधाºयांचा गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. २०१५ व १६ असे दोन वर्ष जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे पाण्याने भरले होते. त्यामुळे विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. गुरांसाठी पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. मात्र मागील वर्षी व यंदाही हे बंधारे कोरडेठाकच राहिल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खाजगी विहिरींवरून पाणी भरावे लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेट
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जळके येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण व बंधाºयाचे काम करण्यात आले होते. बोढरी नदीवर दोन बंधारे लोकसहभागातून करण्यात आले होते. त्याचे जलपूजन २० जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०१६ मध्येही या बंधाºयांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरण ओव्हर-फ्लो न झाल्याने या बंधाºयांमध्ये पाणीसाठाच झालेला नाही. त्यामुळे हे बंधारे कोरडेठाक पडले आहेत.
कोल्हापूर बंधारा दुरूस्तीकडे दूर्लक्ष
बोढरे नाल्यावरच कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही १०-१२ वर्षांपूर्वी बांधला होता. २०१३-१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तो फुटला असून गळती लागली आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. आता जलयुक्त शिवार योजनेच्या निधीतूनच त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्यापही कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे काम या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात जोरदार पाऊस झाला तरीही पाणी साठणे शक्य नाही.
बागायती क्षेत्रावर परिणाम
जळके परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाºयांमध्ये पाणी साठल्यानंतर बागायती क्षेत्रात दुप्पट वाढ झाली होती. दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीसाठाच न झाल्याने यावर विपरित परिणाम झाला आहे.

Web Title: Due to the lack of water, the 'jalyukt' is still useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.