पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:16 PM2018-07-22T12:16:50+5:302018-07-22T12:17:37+5:30

पाय घसरल्याने धरणाच्या काठावरील गाळात फसले

Due to drowning of old age in Bahukht in Parola taluka | पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू

Next

पारोळा, जि. जळगाव : बाहुटे ता. पारोळा येथे चंदन विरभान पाटील या ७० वर्षीय वृद्धाचा पाय घसरून लोणी धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत बाहुटे येथील प्रकाश तापीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार, चंदन विरभान पाटील हे २१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गुरांना चारीत असताना लोणी धरणाजवळ त्यांचा पाय घसरल्याने ते धरणाच्या काठावरील गाळात फसले. त्या वेळी तेथे त्यांना वाचवण्यासाठी जवळपास कोणीच नसल्याने त्यांचा जीव गुदमरून व पाण्यात बुडवून मृत्यू झाला. मयत चंदन पाटील हे घरातील कर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. या बाबत अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Due to drowning of old age in Bahukht in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.