ठळक मुद्देनिवडणूक आयोगाकडून स्पष्ट आदेश नसल्याने संभ्रम.15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभसरपंच निवड थेट जनतेतून असल्याने चुरस वाढणार.

ऑनलाईन लोकमत

अमळनेर - थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत एक सदस्य जादाचे निवडून येणार असल्याने अनेकांना संधी मिळणार आहे. मात्र आरक्षण जुने की नवे आणि सरपंच पदाचा उमेदवार सदस्य निवडणूक लढवू शकेल की नाही याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने जनतेसह अधिकारीही संभ्रमात आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील काही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या सदस्यांची संख्या कायम राहणार आहे. सरपंच म्हणून एक सदस्य वाढणार आहे. त्यामुळे ग्रामीण राजकारणात संधी वाढणार आहे. मात्र सरपंच पदाचे आरक्षण जुने की नवीन याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप आदेश नसल्याने जनता आणि अधिकारीही संभ्रमात आहेत. सरपंचपदासाठी निवडणूक लढविणा:या उमेदवाराला सदस्य पदाची निवडणूक लढवता येईल की नाही याबाबत ही संभ्रम आहे.

15 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. एक पद वाढल्याने सरपंच पदाचे आरक्षण आणि त्याच आरक्षण चे सदस्य असे आरक्षणाची संख्याही वाढणार आहे.

 

आरक्षण व निवड प्रक्रिया याबाबत नियमावली अद्याप प्राप्त नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वेळोवेळी कार्यवाही केली जाईल. - प्रदीप पाटील , तहसीलदार, अमळनेर.