ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.12 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील जुन्या प्रकल्पातील संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती दीपनगर वीज केंद्राचे मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, दीपनगरातील संच क्रमांक तीन एमओडीमध्ये आला आहे. तो कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्यालयातील लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने दिले आहेत. त्यानुसार हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यातून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. संच क्रमांक पाचही सुरू होणार दीपनगरातील नवीन प्रकल्पातील संच क्रमांक पाच देखील कार्यान्वित करण्याचे आदेश लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने आदेश दिले आहेत. मात्र या संचाचे ओव्हरऑईलिंगचे काम सुरू आहे. ते संपताच हा संच देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. संच क्रमांक चार सुरू संच क्रमांक चार सुरु असून त्यातून नियमित वीज निर्मिती सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. एमओडी (मेरीट ऑर्डर डिसपॅच) दीपनगरातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच व आता 210 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक तीन एमओडीमध्ये आहेत (मेरीट ऑर्डर डिसपॅच) महाराष्ट्रातील विद्युत निर्मिती खर्चाच्या क्रमाने वीज निर्मिती संच आहेत.त्यानुसार दर निनिश्चित केले जातात. वीजेचे दर महिन्याला बदलतात, असे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राची वीजेची मागणी वाढली आहे. शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी 17 हजार 411 मेगाव्ॉट इतकी होती.त्यामुळे संच सुरू करण्याचे आदेश आले आहेत. महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील जुना संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्याच्या सूचना लोड मॅनेजमेट व्यवस्थापनाकडून आल्या आहेत. संच कार्यान्वित करण्यात आला आहे. संच क्रमांक पाचही सुरू करण्याच्या सूचना आहेत. हा संचही सुरू होईल. सध्या त्याचे ओव्हरऑल सुरू आहे. आर.आर.बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर, वीज निर्मिती केंद्र, भुसावळ.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.