विहिरीचे बांधकाम करीत असताना दोर तुटल्याने पाडळेच्या मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 06:37 PM2018-01-17T18:37:49+5:302018-01-17T18:44:14+5:30

रावेर तालुक्यातील मोहगण शिवारात भागवत लक्ष्मण महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत आरसीसी रिंग बांधकामासाठी बांधलेल्या पालकचा दोर अचानक तुटल्याने तब्बल ५० फूट उंचीवरून पाडळे बु.येथील ३१ वर्षीय विहीर बांधकाम गवंडी खाली पडून जागीच ठार झाला.

Due to the construction of the well, turtle dies | विहिरीचे बांधकाम करीत असताना दोर तुटल्याने पाडळेच्या मजुराचा मृत्यू

विहिरीचे बांधकाम करीत असताना दोर तुटल्याने पाडळेच्या मजुराचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली घटनाअहिरवाडीतील शेतकरी भागवत महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीचे सुरु होते काम५० फूट उंचीवर विहिरीतील आरसीसी कॉंक्रीट रिंग टाकण्याचे काम सुरु असताना झाली घटना

आॅनलाईन लोकमत
रावेर, दि. १७ : तालुक्यातील मोहगण शिवारात भागवत लक्ष्मण महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत आरसीसी रिंग बांधकामासाठी बांधलेल्या पालकचा दोर अचानक तुटल्याने तब्बल ५० फूट उंचीवरून पाडळे बु.येथील ३१ वर्षीय विहीर बांधकाम गवंडी खाली पडून जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
अहिरवाडी येथील शेतकरी भागवत महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत, ५० फूट उंचीवर विहिरीतील आरसीसी कॉंक्रीट रिंग टाकण्याचे बांधकाम करण्यासाठी नजीर सीताब तडवी (३१) रा.पाडळे बुद्रुक या बांधकाम गवंडीने मंगळवारी जाड दोरखंडास (नाळ्यास) पालक बांधून ठेवली होती. बुधवारी पहाटे त्याच दोरखंडावरून २५ फूट खोलवर असलेल्या पालकचा पत्रा बांधत असताना अचानक दोरखंड खंडित झाला.नजीर तडवी हा खडकाळ तळावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र रामू रायपुरे पाडळे बु. यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी. बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. मयत नजीर सीताब तडवी विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

Web Title: Due to the construction of the well, turtle dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.