जळगावात मनपा कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंदमुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:16 PM2018-04-17T19:16:59+5:302018-04-17T19:16:59+5:30

वसुली, दाखल्यांचेही काम बंद : आजपासून स्वच्छतेची कामेही बंद

Due to closing the writings of NMC workers in Jalgaon, work jam | जळगावात मनपा कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंदमुळे कामकाज ठप्प

जळगावात मनपा कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंदमुळे कामकाज ठप्प

Next
ठळक मुद्देजळगाव मनपा कर्मचारी संघटनांनी निश्चित केले आंदोलनाचे विविध टप्पेकर्मचाºयांचे उद्यापासून कामबंद आंदोलनसोमवारी काळ्या फिती लावून प्रशासनाचा विरोध

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१७ : शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे लिलाव करुन मनपा कर्मचाºयांचे थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी मनपा कर्मचाºयांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे मनपातील सर्व वसुलीच्या कामांसह दाखले काढण्याचे कामदेखील थांबले.
जो पर्यंत मनपा प्रशासनाकडून गाळे लिलाव होणार नाहीतोपर्यंत मनपा कर्मचाºयांचे आंदोलन सुरु राहिल असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर कर्मचारी संघटनेसह इतर संघटनांनी दिला आहे.
मनपा कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे विविध टप्पे निश्चित केले आहेत. त्यानुसार सोमवारी काळ्या फिती लावून प्रशासनाचा विरोध केल्यानंतर मंगळवारी सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाºयांनी लेखणीबंद आंदोलन केले. केवळ राजपत्रित अधिकारी वगळता मनपातील इतर अधिकाºयांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे सर्व विभागातील कामकाज ठप्प होते.
उद्यापासून कामबंद आंदोलन
अक्षय्यतृतीयेच्या सुट्टीमुळे मंगळवारपासून होणारे कामबंद आंदोलन गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, सफाईचे काम मात्र बुधवारपासूनच बंद राहणार आहे. सफाई कर्मचाºयांसह आरोग्य निरीक्षक व अधीक्षकदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरु होणार असल्याने मनपातील एकही कर्मचारी काम करणार नसल्याची सफाई मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी दिली.
मनपा शिक्षक संघाचा पाठिंबा
महापालिका कर्मचाºयांचा या आंदोलनास मनपा शिक्षक संघाने देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शाळा व शाळांचे कामकाजदेखील बंद राहणार आहे. गेल्या १५ महिन्यांपासून महापालिकेचे शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे पालिकेकडून देण्यात येणारे ५० टक्के वेतनपोटी सुमारे २२ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. यामुळे शिक्षकांवरदेखील उपासमारीची वेळ आल्याचे मनपा प्राथमिक शिक्षकसंघाने पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Due to closing the writings of NMC workers in Jalgaon, work jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.