कोरडवाहू जमिनीतील कपाशी पावसाअभावी होरपळतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:06 AM2018-10-07T01:06:48+5:302018-10-07T01:10:14+5:30

बोरखेडे बुद्रुक परिसरातील कोरडवाहू जमिनीत पेरलेल्या कापसाचे पीक यंदा पावसाअभावी आधीच संकटात सापडले असतांंना आॅक्टोबर हीटमुळे ते अक्षरश: होरपळून निघत आहे.

 Dryland soil climbs due to lack of rain | कोरडवाहू जमिनीतील कपाशी पावसाअभावी होरपळतेय

कोरडवाहू जमिनीतील कपाशी पावसाअभावी होरपळतेय

Next
ठळक मुद्देकपाशीच्या एका झाडाला फक्त पाच ते दहा बोंडे लागली आहेत.बियाणे, किटकनाशके, खते यांचा सुध्दा खर्च निघणार नसल्याने शेतकरी निराश

बोरखेडे बुद्रूक ता. चाळीसगाव : बोरखेडे बुद्रुक परिसरातील कोरडवाहू जमिनीत पेरलेल्या कापसाचे पीक यंदा पावसाअभावी आधीच संकटात सापडले असतांंना आॅक्टोबर हीटमुळे ते अक्षरश: होरपळून निघत आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाल्याने या वर्षी मोठया मेहनतीने व आशेने कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यात शासनाच्या हमी भावाने आनंदीत झालेला शेतकरी मात्र पावसाअभावी कोरडवाहू कपाशीची वाढ खुंटली असल्याने जेरीस आला आहे. कपाशीच्या एका झाडाला फक्त पाच ते दहा बोंडे लागली आहेत.
मशागत, बियाणे, किटकनाशके, खते यांचा सुध्दा खर्च निघणार नसल्याने शेतकरी निराश झालेला आहे . दरम्यान, काही शेतकऱ्यांना अजून देखील बोंड अळीचे अनुदान मिळाले नाही व बरेच शेतकरी कर्जमाफीला पात्र असून सुद्धा अजून त्यांना लाभ मिळाला नाही . त्यात कपाशी पिकाच्या दुरवस्थेचे चित्र, गुरांचा चाºयाचा प्रश्न आणि शेती संकटात सापडल्याने रोजगार मिळण्याबाबत सांशकता आदी प्रश्न उभे आहेत.

Web Title:  Dryland soil climbs due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस