मोताळ्याजवळ चारचाकी वाहन पलटल्याने जामनेरचा चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 6:26pm

साखरपुड्याला जात असताना झालेल्या अपघातात आठ जखमी

आॅनलाईन लोकमत जामनेर,दि.१० : साखरपुड्यासाठी जात असलेल्या जामनेर येथील चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने मोताळा (जि.बुलढाणा)जवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजता अपघात झाला. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (वय-२२) हा ठार झाला तर वाहनातील आठ जण जखमी झाले आहेत. एक जण गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. जामनेर शहरातील मलिकनगर भागात राहणाºया शाहरूख शेख बशीर याचा साखरपुडा मोताळा जवळील खरबडी येथे असल्याने त्याचे मित्र सकाळी दहा वाजता चारचाकी वाहनाने निघाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाचे मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. त्यात चालक शाहरूख शेख खालीद (रा.जामनेर) हा ठार झाला. तर शेख खालीद शेख शौकत, रहिम शाह नदीर शाह, शेख नदीम शेख नईम, शेख नसीम शेख बसीर, शेख शाजीद शेख बुढन यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शेख शाहरूख शेख रफिक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

मयताचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडा अपघातातील मयत शाहरूख शेख खालीद हा मदीना नगरातील रहिवासी आहे. त्याचा दहा दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. अपघाताची माहिती शहरात समजताच मदिना नगर, मलिक नगर, घोडेपीर नगर भागात शोककळा पसरली. शुक्रवारची नमाज असल्याने या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सर्व समाजबांधव अराफत चौकात जमा झाले.काही नागरिकांनी मोताळा येथे धाव घेतली.

संबंधित

नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे बसने आगारातच प्रवाशाला चिरडले
सातारा : भरधाव कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी, फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटना; संरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला
कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू, भिवंडी-वाडा मार्गावरील घटना
ठाण्यात वातानुकूल यंत्राची दुरुस्ती दरम्यान झालेल्या स्फोटात तंत्रज्ञाचा जागीच मृत्यु
लग्नाला विरोध होणार म्हणून जळगावला प्रेमीयुगुलाने संपविली जीवनयात्रा

जळगाव कडून आणखी

लग्नाला विरोध होणार म्हणून जळगावला प्रेमीयुगुलाने संपविली जीवनयात्रा
जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे प्रौढाचा संशयास्पद मृत्यू
मुंबईच्या पथकाकडून जळगावातील धान्य गोदाम सील
जळगावात काँग्रेसचे उद्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
जळगाव तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला पेट्रोल टाकून जाळले

आणखी वाचा