रावेर तालुक्यातील सावदा पालिकेवर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:14 PM2018-12-14T15:14:45+5:302018-12-14T15:15:55+5:30

सावदा , ता.रावेर, जि.जळगाव : विविध मागण्यांसाठी दिव्यांग सेनेतर्फे सावदा पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना ...

Divya Chowk's Front Against Savda Palwal of Raver Taluka | रावेर तालुक्यातील सावदा पालिकेवर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

रावेर तालुक्यातील सावदा पालिकेवर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देपाच टक्के निधी, व्यवसायासाठी दिव्यांगांना स्टॉल द्यामूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत माहिती मिळावीविविध मागण्यांचे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

सावदा, ता.रावेर, जि.जळगाव : विविध मागण्यांसाठी दिव्यांग सेनेतर्फे सावदा पालिकेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत आणि सावदा शहराध्यक्ष विशाल कासार यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला.
निवेदनात दिव्यांग बांधवांनी पालिका हद्दीतील राहात असलेल्या दिव्यांगाचा पाच टक्के निधी, व्यवसायासाठी दिव्यांगाना स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावे, मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत माहिती मिळावी, अंधबांधवांना आॅडिओ भाषेत माहिती मिळावी, दिव्यांग बांधवाचा प्रचार व प्रसार, जनजागृती करणे पालिकेचे कर्तव्य आहे. मूकबधिर, कर्णबधिर, अंध, अस्थिव्यंग यांना पालिका अंतर्गत असलेल्या सुविधा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली.
पालिकेत मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी धरणगाव शहराध्यक्ष नंदलाल कुलथे, फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष नाना मोची, ललित वाघुळदे, राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, तेजस वंजारी, दीपक बारी, दिलीप जैन, महिला संघटक प्रमुख संगीता गडे, दिव्यांग सेना रावेर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल पाटील, महेश महाजन, दिनकर बुवा उपस्थित होते.
अक्षय महाजन यांनी दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डाबाबत मार्गदर्शन केले. मुख्याधिकाºयांनी १५ दिवसात दिव्यांगाचा कल्याणकारी निधी वाटप केला जाईल, असे आश्वासन दिले.
मोर्चात धरणगाव, सावदा, फैजपूर, रावेर, केºहाळा येथील दिव्यांग सेना पदाधिकारी, कार्यकर्ते व दिव्यांग बाधव सहभागी झाले.

Web Title: Divya Chowk's Front Against Savda Palwal of Raver Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.