जळगाव जिल्ह्यातील घोडगाव जिल्हा परिषद सदस्यासह पाच जणांकडे घरफोडी करीत चोरट्यांनी लांबविला २५ लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:47 PM2017-11-02T16:47:50+5:302017-11-02T16:53:48+5:30

घोडगाव येथे बुधवारी मध्यरात्री जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्यासह डॉ.बी.आर.पाटील व योगेश पाटील यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली.

District Council members of Ghodgaon in Jalgaon district have been abducted and the thieves have been fined 25 lakhs. | जळगाव जिल्ह्यातील घोडगाव जिल्हा परिषद सदस्यासह पाच जणांकडे घरफोडी करीत चोरट्यांनी लांबविला २५ लाखांचा ऐवज

जळगाव जिल्ह्यातील घोडगाव जिल्हा परिषद सदस्यासह पाच जणांकडे घरफोडी करीत चोरट्यांनी लांबविला २५ लाखांचा ऐवज

Next
ठळक मुद्देघोडगाव येथील बंद घरे चोरट्यांनी केले लक्ष्यकुसुंबा येथील दोन ठिकाणी घरफोडीचोरट्यांचा शोध घेण्यात श्वान पथकाला अपयश

आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.२ : तालुक्यातील घोडगाव येथे बुधवारी मध्यरात्री जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्यासह डॉ.बी.आर.पाटील व योगेश पाटील यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी सुमारे २५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
चोरट्यांनी जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्याकडील १० लाख रोकड व सात लाखाचे सोने चोरीस गेले आहे. तर डॉ.बी.आर.पाटीलकडे १ लाख २५ हजारांचा ऐवज तर योगेश पाटीलकडे १० हजार व १० ग्रँम सोने चोरीस गेले आहे. ही सर्व घरे बंद असल्याने चोरट्याने संधी साधत घरफोडी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यात आला. चोरट्यांनी कुसुंबा गावात देखील दोन घरात घरफोडी केली. या ठिकाणी किती ऐवज गेला याबाबत माहिती समजू शकली नाही.
घटनास्थळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी संपर्क साधत या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्याची सुचना केली.

Web Title: District Council members of Ghodgaon in Jalgaon district have been abducted and the thieves have been fined 25 lakhs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.