जिल्हा बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी मार्ग काढणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:00 PM2019-05-17T22:00:25+5:302019-05-17T22:02:20+5:30

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

The District Bank and the Sugar Factory have to make a road for farmers' welfare | जिल्हा बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी मार्ग काढणे आवश्यक

जिल्हा बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी मार्ग काढणे आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीतकार्यक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्याचा परिमाण ऊस लागवडीवर४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना ‘मसाका’

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासूनचे पेमेंट मसाकाने दिलेले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्याचे खाते एनपीएमध्ये केल्याने कर्जपुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँक व कारखाना यांनी समन्वय साधावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेली ४२ वर्षे सलगपणे गाळप करणारा एकमेव कारखाना असून, कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. त्यांचा परिमाण ऊस लागवडीवर झाला. तसेच टनेजमध्येसुद्धा घट आलेली आहे.
कारखान्याच्या गाळप हंगाम २०१८-१९ आर्थिक अडचणीमुळे एक महिना उशिरा सुरू झाला, त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले केंद्र सरकारने साखर विक्रीसाठी कोटा पद्धत सुरू केल्याने साखर साठा पडून आहे. साखरेस उठाव नसल्याने साखर विक्री मंदावलेली आहे. त्यामुळे बँक व्याजाचा बोझा वाढत आहे. मागील हंगामाची साखर तसेच चालू हंगामाची शिल्लक साखर यामुळे कर्ज उचलीची मर्यादा संपलेली आहे. सदर मर्यादा वाढवून मिळण्याबाबत बँकेस प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. याबाबत जिल्हा बँकेकडे सतत पाठपुरावा मधुकर कारखान्याने केला आहे.
कर्ज उचल मर्यादा बँकेकडून अद्याप वाढवून न मिळाल्यामुळे १ फेब्रुवारीपासून पुरवठा झालेल्या उसाचे पेमेंट शेतकºयांना करखान्याकडून अद्याप करता आलेले नाही. कर्ज उचल मर्यादा वाढवून देण्यासाठी बँकेस अपुरा पुरावा, एन.पी.ए. नेटवार्थ इ. बाबींची तांत्रिक अडचण असल्याने तसेच त्यासाठी शासनाची थकहमी आवश्यक आहे. अशा बाबी चर्चेमध्ये कारखान्याच्या वतुर्ळात सुरू आहे मधुकर कारखान्याकडे बँकेची असलेली कर्ज यामध्ये प्रामुख्याने साखर मालतारणवरील कर्ज रु.५७ कोटी आहे. सदर कर्ज हे साखरेच्या ताबेगहाणावरील आहे. तसेच साखरेचे भाव घसरल्याने सदर साखर साठ्यावर रु. १९ कोटींचे शॉर्ट मार्जिन आहे. माल तारण कर्ज वगळता कारखान्याकडे इतर कर्ज रु. ७.५७ कोटी इतके आहे. तसेच कारखान्याच्या संपूर्ण मालमत्तेचे प्रथम अग्रहक्कांचे गहाणखत बँकेस करून दिलेले असल्याने कारखाना जास्तीच्या कर्जाची मागणी जिल्हा बँकेकडे करू शकतो. म्हणून बँकेने किमान ऊस पुरवठादार शेतकºयांचे ऊस पेमेंट करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर इतर देय रकमांबाबत निर्णय चचेर्अंती घेता येईल, अशी भूमिका कारखान्याने मांडली.
बँकेस येणाºया तांत्रिक अडचणी व ऊस पेमेंटबाबतची वस्तुस्थिती याची सांगड घालून बँक व साखर कारखाना यांनी शेतकरी हितासाठी यामधून योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. सध्या शेतकरी दुष्काळामध्ये होरपडत आहे. त्यास येणाºया हंगामासाठी बी-बियाणे, खते, मशागत यासाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी वेळेत शेतकºयांना पैसा न मिळाल्यास त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याचा गांभिर्याने विचार करावा, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

Web Title: The District Bank and the Sugar Factory have to make a road for farmers' welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.