ठळक मुद्देस्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी व श्रोत्यांनी स्व. दामूअण्णा दाते सभागृह तुडुंब भरले होते. यानिमित्ताने धरणगाव शहरातील पी. आर. बालकवी, इंदिरा विद्यालय व साकरे विद्यालयातील विद्याथ्र्यांनी कवी किनगावकर यांच्याशी त्यांच्या दहावीच्या मराठी पुस्तकातील ‘वारस’ या कवितेबाबत प्रश्नोत्तर व चर्चेतूून संवाद साधला.

ऑनलाईन लोकमत धरणगाव (जि. जळगाव), दि. 13 : बालकवींच्या जन्मगावी अखंड 25 वर्षे बालकवींची स्मृती जतन करत साहित्य, कला व संस्कृतीचा प्रसार करणा:या साहित्य कला मंचचे कार्य अभिनंदनीय आहे. या संस्थेतर्फे दिल्या जाणा:या बालकवी काव्य पुरस्कारांना महाराष्ट्र स्तरावर लोकमान्यता प्राप्त झाली आहे. पुरस्कारार्थ्ीनी बालकवींचा वारसा जोपासून पुरस्काराचा आनंद जीवनभर हृदयात साठवून ठेवण्यासारखा असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ कवयित्री माया धुप्पड यांनी काढले. बालकवींच्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी प्रकाश किनगावकर यांच्या हस्ते प्रसिध्द कवी व लातूर विभागीय मंडळाचे शिक्षण सचिव शशिकांत हिंगोणेकर यांना राज्यस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार, तर तरडी, ता.पारोळा येथील कवी दिलीप पाटील यांना खान्देशस्तरीय बालकवी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदिरा कन्या विद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. पाटील, विक्रम वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आर. एन. महाजन, साहित्य कलामंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते. अतिथींचा परिचय बी. डी. शिरसाठ व डी. एस. पाटील यांनी करून दिला. मंचच्या उपक्रमांना आर्थिक सहकार्य म्हणून प्रा. सी. एस. पाटील यांनी 1100 रुपये देणगी दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रदर्शन शरदकुमार बन्सी यांनी केले.