राष्टÑवादीत अंतर्गत कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:52 PM2018-12-07T12:52:20+5:302018-12-07T12:54:05+5:30

महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला

Discrimination under nationalism | राष्टÑवादीत अंतर्गत कलह

राष्टÑवादीत अंतर्गत कलह

Next

चंद्रशेखर जोशी
जळगाव : जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे तोंड देणारा पक्ष म्हणून तुर्तास राष्टÑवादी कॉँग्रेस या पक्षाकडे बघितले जाते. पक्षात नुकतेच काही बदल होऊन जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. रवींद्र पाटील तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून नामदेव चौधरी यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर महानगर राष्टÑवादी कॉँग्रेसने शहरात संघटन उभे करून सरकार विरोधात काही आंदोलने केली. या आंदोलनांना पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाद दिली. मात्र यानंतर महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला व संपर्क प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकारिणी स्थगित केली. अंतर्गत कलहातूनच हे प्रकार सुरू असल्याचे आता लक्षात येत आहे.
सोनिया गांधींना विरोध करत कॉँग्रेसमधून खासदार शरद पवार यांच्या बरोबर राज्यातील एक मोठा गट बाहेर पडला. जळगाव जिल्ह्यातही मोठी पडझड त्यावेळी झाली. कॉँग्रेसचे म्हणून ओळख असलेल्या बºयाच नेत्यांनी या पक्षाला रामराम करत राष्टÑवादीचे घड्याळ हाताला बांधले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाने बºयापैकी यश मिळविले. एकेकाळी राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले अरूणभाई गुजराथींसारखे नेते या पक्षाबरोबर पहिल्यापासून आहेत. यासह भाजपातून दुखावलेली काही मंडळीही या पक्षाबरोबर होती. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळाले. राज्यात सत्ता मिळून पक्षाचे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे तत्कालीन आमदार गुलाबराव देवकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले. परिवहन, कृषी राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आली. सत्ता तिकडे वळायचे ही राजकीय क्षेत्रातील अनेकांची भूमिका असते. त्यानुसार सत्ता आल्याने राष्टÑवादी कॉँग्रेसकडे अनेक हौशी मंडळी वळली. पक्षाच्या कार्यालयात पाय ठेवायला जागा नसायची, अशीही परिस्थिती सत्ता होती त्या काळात दिसून येत असे. २०१४ पर्यंच्या निवडणुकीपर्यंत हीच स्थिती होती. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पक्षाला अपयश आले. केवळ पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणुकीत डॉ. सतीश पाटील हे निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोपविले. आता येणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सतीश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदावर राहण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षाने जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. रवींद्र पाटील व महानगर जिल्हाध्यक्षपदी नामदेव चौधरी यांची निवड केली. या दोघांनी पदास साजेशी आंदोलनेही केली. मात्र महानगर कार्यकारिणी जाहीर केल्यावर अंतर्गत कलहाचीच प्रचिती आली आहे.

Web Title: Discrimination under nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.