शेंदुर्णीत शिवसेना व मनसेच्या उमेदवारांची अनामत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 03:50 PM2018-12-11T15:50:05+5:302018-12-11T15:52:36+5:30

शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेना व मनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

The deposit of Shiv Sena and MNS candidates in the league was seized | शेंदुर्णीत शिवसेना व मनसेच्या उमेदवारांची अनामत जप्त

शेंदुर्णीत शिवसेना व मनसेच्या उमेदवारांची अनामत जप्त

Next
ठळक मुद्देशेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीतील स्थितीशिवसेना व मनसेच्या १८ जणांचा समावेशसाहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती

जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेनामनसे उमेदवारांची अनामत जप्त झाल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली. यासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढविणाºया शिवसेनामनसेच्या बहुतांश उमेदवारांची अनामत जप्त झाली.
नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविलेल्या शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बारी, मनसेच्या सरीता चौधरी यांची अनामत जप्त झाली. नगरसेवकपदाची निवडणुक लढविलेले व अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार असे- प्रभाग १ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ४ सरीता चौधरी (मनसे), मीराबाई मांग (शिवसेना), प्रभाग ५ अजगर अकबर (मनसे), प्रभाग ७ भक्ती कुलकर्णी (मनसे), प्रभाग ९ उषा बारी (मनसे), मनीषा बारी (शिवसेना), प्रभाग १० ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना) , प्रभाग ११ संजय सुर्यवंशी (शिवसेना), प्रभाग १२ विजयानंद कुलकर्णी (मनसे), प्रभाग १३ विजयानंद कुलकर्णी (मनसे), शेख रियाज फयाज (अपक्ष), प्रभाग १४ उषा बारी (मनसे), प्रभाग १६ अशोक बारी (शिवसेना) व पुनम बारी (अपक्ष), प्रभाग १७ सिंधुताई माळी (शिवसेना). अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक शिवसेना व मनसेचे उमेदवार होते.

Web Title: The deposit of Shiv Sena and MNS candidates in the league was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.