अमळनेर येथे धरणग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 03:47 PM2019-04-19T15:47:04+5:302019-04-19T15:48:53+5:30

पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.

Demonstrations before the Chief Minister of Damodar | अमळनेर येथे धरणग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

अमळनेर येथे धरणग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

Next
ठळक मुद्देकाळ्या फिती लावून केले आंदोलनपाडळसरे धरण तातडीने पूर्ण करागटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी ठेवली पाळतआंदोलकांना पोलिसांनी धरले रोखूूनआंदोलनामुळे प्रशासनाची उडाली धावपळ

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.
पाडळसरे धरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही. जिल्ह्यातील असूनही जलसंपदा मंत्र्यांनी धरणाकडे आणि धरणासाठी प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे उपोषण, जेलभरो, जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटून अमळनेरसह सहा तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन, निवेदन देणेचे प्रयत्न करू नये, आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा.शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे, महेश पाटील, देवीदास देसले, नामदेव पाटिल, सतीश काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रतापमिलमधील रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर प्रकट झाले.'पाडळसरे धरण झालेच पाहिजे!, ‘धरण आमच्या हक्काचे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या या निदर्शनानी सतर्क असलेले पोलिसानी आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली.
पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले, असे यावेळी संघर्ष समितीचे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, तर ही निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही, असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्र्यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला, असे समितीचे रणजित शिंदे यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखून धरले. तत्काळ प्रतिबंधात्मक अटक करून पोलीस गाडीत टाकत सभास्थळ मार्गाहून घेऊन गेले, तर पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांच्यासह अजयसिंग पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, रामराव पवार, सुपडू बैसाणे, डी.एम.पाटील, आर.बी.पाटील, संजय पुनाजी पाटील आदींना निदर्शनात्मक हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा निघत असताना जागेवरच रोखून धरले होते.

Web Title: Demonstrations before the Chief Minister of Damodar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.