भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:29 PM2019-02-20T17:29:56+5:302019-02-20T17:30:57+5:30

पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Demolition of hunger strike in village Juvardi in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण

भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे ग्रामस्थांचे आमरण उपोषण

Next
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी निर्धार ठाम भूसंपादन निधी वनविभागाकडे वर्ग कराअपूर्ण कामास प्रशासकीय मान्यता द्या

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : पाझर तलाव क्रमांक ३, नदीजोडचा पोहोच कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पाच्या मागण्यांवरुन साखळी उपोषणास बसलेल्या जुवार्डी ग्रामस्थांचा आता मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचा नाही, असा दुसºया दिवशीही निर्धार कायम होता. ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाबरोबरच १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

पाझर तलावाच्या कामात १३ हेक्टर वनविभागाच्या बाधीत जमिनीचा भूसंपादन निधी ८१ लाख ३८ हजार प्रत्यक्ष वनविभागाकडे वर्ग केल्याशिवाय व आडळसे-जुवार्डी-पथराड नदीजोडचा पोहोच कालवा, बहाळ-जुवार्डी कालवा आदी अपूर्ण सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता-निधी यावर ठोस निर्णय झाल्यासच उपोषण मागे घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहे.
काशिनाथ पाटील, रमेश पाटील, हेमराज पाटील, रवींद्र्र पाटील, तात्या पाटील, जगन पाटील, सखाराम पाटील, विजय साळुंखे, प्रकाश पाटील व रवींद्र चिंधू पाटील आदी १० ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत.
मंगळवारी उपोषणस्थळी तहसीलदार वाघ यांनी ग्रामस्थांना जळगाव येथे जावून चर्चा करण्याची विनंती केली. ती ग्रामस्थांनी धुडकावली. पं.स.चे सभापती रामकृष्ण पाटील, पाचोरा कृउबाचे अ‍ॅड.विश्वास भोसले, डॉ.उत्तमराव महाजन, अमोल शिंदे, संजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, जे.के.पाटील यांनी, तर बुधवारी माजी आमदार दिलीप वाघ, तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, जि.प.चे माजी सभापती विकास पाटील, बापूराव पाटील आदींनी उपोषणस्थळी ग्रामस्थांशी चर्चा केली.
दरम्यान, विद्यमान आमदार-खासदार यांनी अद्याप उपोषणाची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
उपोषणासंर्दभात जिल्हाधिकाºयांनी दि.२० रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांना तातडीने पत्र देत वनविभागाला द्यावयाच्या भूसंपादन निधीबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Demolition of hunger strike in village Juvardi in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.