सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 08:34 PM2017-09-25T20:34:39+5:302017-09-25T20:38:41+5:30

राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.

Death due to an accident after fighting for six days after death | सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू

सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवाहन चालकावर वाढीव कलम लावले १९ सप्टेंबर रोजी अपघातबसने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली होती

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि २५: : राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.
बडगुजर हे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मू.जे.महाविद्यालय परिसरात शिकवणीला गेलेल्या मुलीला घेण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.११४२) महामार्गावरुन येत असताना जळगाव आगाराच्या जळगाव -पळसोद या एस.टी बसने (क्र.एम.एच.१२ बी.टी.०४१७) विरुध्द दिशेने समोरुन ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली होती. त्यात बडगुजर गंभीर जखमी झाले होते. त्या दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, एस.टी.बसचालक बळवंत रामदास साळुंखे (रा.किनोद, ता.जळगाव) यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी गिरधर निकम यांनी दिली. अमृत बडगुजर हे बांभोरी परिसरातील बॉश्च कंपनीत कामगार पुरवित होते.

Web Title: Death due to an accident after fighting for six days after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.