पहूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सांगवीतील तेराजणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:50 PM2019-05-19T16:50:42+5:302019-05-19T16:52:13+5:30

अल्पवयीन मुलगी व पोलीसाकडून तक्रार

The crime of riots against Sanghvi Tawrajan, who assaulted the entrance to the police station | पहूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सांगवीतील तेराजणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

पहूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सांगवीतील तेराजणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

Next

 

 

 




पहूर ता जामनेर : येथील पोलिस स्टेशनमध्ये हाणामारी करणाºया सांगवीतील १३ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी येथे लहान मुलांच्या भांडणावरून तडवी समाजाच्या दोन गटात शनिवारी रात्री हाणामारी झाली होती. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या मुलीच्या तक्रारीवरून तसेच पहूर पोलिस स्टेशनमध्ये पोलीसांसमक्ष पुन्हा या दोन गटांनी आपसात मारहाण केली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचाºयाच्या तक्रारीवरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित लोक फरार असून सांगवीत लहान मुलांचे भांडणे शनिवारी रात्री झाले होते यावरून तडवी समाजाच्या दोन गटांनी हाणामारी केली. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगही झाला. दोन्ही गट पहूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास आले असता पोलीसांसमक्ष पुन्हा तुफान हाणामारी केली. यात भांडण सोडविणारे पोलीस कर्मचारी विनय सानप किरकोळ जखमी झाले आहे. याच वेळी जमावातील काहींनी पोलिस स्टेनवर किरकोळ दगड फेक केली होती.
याप्रकवणी गावातील घटनेबाबतम अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अकबर समसोद्दीन तडवी, अनिल शब्बीर तडवी, बादशहा समसोद्दीन तडवी, अकबर समसोद्दीन तडवी, सुग्रा अनिल तडवी, दिलावर शब्बीर तडवी , शाहरूख सिराज तडवी, इकबाल तडवी, मनोज बनारखाँ तडवी, मौसीम अनिल तडवी, दिलीप बाबू तडवी, आकाश अकबर तडवी व हिलाल अनिल तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडक कारवाईच्या सूचना
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी डिवायएसपी ईश्वर कातकडे यांना कडक कारवाईच्या सुचना दिल्यावरून पोलीस कर्मचारी रमण कंडारे यांची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान पोलिस कर्मचारी रमण कंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तेरा जणांविरूध्द भा.द.वी.३५४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९, प्रमाणे दंगल, दमदाटी, मारहाण व विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे यांनी रविवारी दिवसभर या घटनेची चौकशी केलीे.
कायदा सुव्यवस्थेचे काय ?
पोलीसांमक्ष पोलीस स्टेशनमध्ये दोन गट आमने सामने येऊन हाणामारी करतात. भांडण सोडविणाºया पोलीस कर्मचाऱ्यांला धकाबुक्की केली जाते, एवढेच नव्हे तर हातात दगड घेऊन पोलीस स्टेशनवर भिरकवितात. या फोफावलेल्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीमुळे खुद्द पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचे काय? असा प्रश्न ही समाजमनाला पडला आहे.
सांगवी धुमसतेय
सांगवी गावात अनेक दिवसांपासून छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर सांगवी अलीकडच्या काळात संवेदनशील म्हणून समोर आले आहे. थातुरमातुर कारवाईमुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. वेळीच गंभीर दखल पोलिसांनी घेतली असती तर पोलीसांना हा दिवस पहावयास लागला नसता, असाही सुर उमटत आहे.
 

 

 

 

Web Title: The crime of riots against Sanghvi Tawrajan, who assaulted the entrance to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.