बोदवड येथे रस्त्यावर कापसाची बर्निंग ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 07:13 PM2019-04-22T19:13:40+5:302019-04-22T19:16:21+5:30

लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमधील मजुरांनी खाली उड्या मारल्या. यामुळे ते सुरक्षित राहिले.

Cotton Burning Truck on the Road in Bodwad | बोदवड येथे रस्त्यावर कापसाची बर्निंग ट्रक

बोदवड येथे रस्त्यावर कापसाची बर्निंग ट्रक

Next
ठळक मुद्दे लोंबकळणाऱ्या वीज तारांचा कापसाच्या ट्रकचा स्पर्श ट्रकसह कापसाचे नुकसानजीवित हानी टळलीमनूर रस्त्यावरील भरदुपारची घटनाचालकासह ट्रकमधील मजुरांनी उड्या मारल्याने ते सर्व सुरक्षित

बोदवड, जि.जळगाव : लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमधील मजुरांनी खाली उड्या मारल्या. यामुळे ते सुरक्षित राहिले.
बोदवडसह परिसरातील खेड्यांवरून सुमारे ५० क्विंटलपर्यंत कापसाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-२२८१) बोदवडकडे येत होता. बोदवड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर मनूर रस्त्यावर हा ट्रक आला. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जात असलेल्या उच्च दाबाच्या लोंबकळलेल्या विद्युत तारांचा ट्रकमधील कापसाला स्पर्श झाला. कडक उन्ह होते. यामुळे येथे आगीची ठिणगी उडत कापसाच्या गंजीला लागली. आगीने हळूहळू उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली. आग लागल्याचे पाहताच या ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या आठ ते दहा मजुरांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे धावत्या ट्रकमधून मजुरांनी उड्या मारल्या. यातच ट्रकचालक मुकेश खराटे यानेही प्रसंगावधान राखत वाहन जागेवरच बंद केले आणि वाहनातून उडी मारली. यामुळे चालकासह ट्रकमधील सर्व मजूर सुरक्षित राहिले. आगीत सुमारे सात क्विंटलपेक्षा अधिक कापूस जळून खाक झाला. तसेच मिनी ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला.
यानंतर गाडीचालकाने गाडीमालक अभय बाफना रा.बोदवड यांना या घटनेची माहिती कळविली. त्यांनी जामनेर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. नंतर आग आटोक्यात आली, परंतु तोपर्यंत ट्रकमधील कापूस जळून खाक झालेला होता.
दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात तुटलेल्या वीज तारांचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आर्थिक नुकसान झाल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
या घटनेत कापसाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Cotton Burning Truck on the Road in Bodwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.