चाळीसगाव येथे वादविवाद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:38 AM2018-10-13T00:38:35+5:302018-10-13T00:39:19+5:30

वक्तृत्व कलेने जग जिंकता येते. त्यामुळे या कलेचाही विद्यार्थ्यांना सराव केला पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वकृत्व आणि संभाषणातील बारकावे लक्षात घ्यावे, असे हितगूज चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी येथे केले.

Controversial competition in Chalisgaon | चाळीसगाव येथे वादविवाद स्पर्धा

चाळीसगाव येथे वादविवाद स्पर्धा

Next
ठळक मुद्देवक्तृत्व कलेने जग जिंकता येतेजो चांगलं प्रेझेंट करतो तो चांगलं जीवनही जगू शकतो

चाळीसगाव, जि.जळगाव : वक्तृत्व कलेने जग जिंकता येते. त्यामुळे या कलेचाही विद्यार्थ्यांना सराव केला पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वकृत्व आणि संभाषणातील बारकावे लक्षात घ्यावे, असे हितगूज चाळीसगावशिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी येथे केले.
शनिवारी सकाळी दहा वाजता चाळीसगाव महाविद्यालय आयोजित वादविवाद -वक्तृत्त्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बी. पी. आर्टस ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृतीकरंडक वादविवाद स्पर्धा, गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्त्व स्पर्धा व नारायणदास अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त-वक्तृत्व स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी प्राचार्य तानसेन जगताप होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायदास अग्रवाल यांच्यासह व्यासपीठावर मिलिंद देशमुख, डॉ.एम. बी. पाटील, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, क. मा. राजपूत, राजेंद्र चौधरी, योगेश अग्रवाल, डॉ.सुनील राजपूत, डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.वाणी, डॉ. वले, डॉ.सतीश बडवे, डॉ.योगेश बोरसे, डॉ.कैलास कळकटे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी केले.
उद्घाटनपर भाषणात प्राचार्य तानसेन जगताप म्हणाले की, माणूस मेला तरी चालेल परंतु माणुसकी जिवंत असली पाहिजे, सध्याचे जग हे प्रेझेंटेशनच जग आहे, जो चांगलं प्रेजेंट करेल तो जगात चांगलं जीवन जगू शकतो, तसेच वादविवाद -वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व चांगली शैली असणेसुद्धा गरजेचे आहे, आपण जर मनाने सुधृढ असाल तर तरच चांगले विचार आपण व्यक्त करू शकतो कारण बोलणंसुद्धा ही एक कला आहे, असेही जगताप म्हणाले.
आभार डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ.किरण गंगापूरकर यांनी केले.



 

 

Web Title: Controversial competition in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.