संपर्क फाउंडेशनचा रुग्ण सुश्रृषेतून सेवा यज्ञ : सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:01 AM2019-07-21T01:01:42+5:302019-07-21T01:02:10+5:30

गंभीर आजाराने पीडीत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयाना आधार देण्याचा इवलासा प्रयत्न

The contact foundation of the patient, the service sacrifice: the name of the service and the interests of the person. | संपर्क फाउंडेशनचा रुग्ण सुश्रृषेतून सेवा यज्ञ : सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि

संपर्क फाउंडेशनचा रुग्ण सुश्रृषेतून सेवा यज्ञ : सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि

Next

चुडामण बोरसे 
जळगाव : सेवेतून संपर्क आणि संपर्कातून रुग्णसेवा असा एक आगळा- वेगळा उपक्रम जळगावातील भारत विकास परिषदेने संपर्क फाऊंडेशनमाध्यमातून सुरु केला आहे. संंत तुकाराम महाराजांच्या ‘सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि’ या अभंगाप्रमाणेच या फाऊंडेशनची वाटचाल सुरु झाली आहे.
आजच्या धावपळीच्या काळात नोकरी आणि व्यवसाय सांभाळून घरातील सदस्यांच्या आजारपणात त्यांच्या सेवा - शुश्रृषेसाठी रोज वेळ देणे बऱ्याचदा शक्य होत नाही. यासाठी रुग्णसेवेच्या माध्यमातून संपर्क फाऊंडेशनने मदतीचा हात सुरु केला आहे.
गंभीर आजाराने पिडित तसेच चालू- फिरु न शकणाºया रुग्णांना त्यांच्या घरीच प्रशिक्षित, विश्वासू व अनुभवी नर्स, आया, वॉर्डबॉयच्या माध्यमातून सेवा व देखभालीची सुविधा अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचे सेवाकार्य फाऊंडेशनने सुरुकेले आहे. या उपक्रमात सध्या दिवसाला सहा रुग्णांसाठी सेवा दिली जात आहे. यासाठी फाऊंडेशनच्या कार्यालयात अल्प शुल्क जमा करावे लागते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाकडून खात्री करुन घेतल्यानंतर सेवा पुरविली जाते.
फाऊंडेशनकडे सध्या स्त्री आणि पुरुष परिचारकांची संख्या सहा आहे. गरज पडल्यास नर्सिंग कॉलेज अथवा ओव्हरटाईम करु शकतील, असे वॉर्डबॉयला संधी दिली उपलब्ध करुन दिली जात आहे. १२ मार्च २०१८ रोजी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली. यानंतर १३ आॅगस्ट २०१८ रोजी या संपर्क फाऊंडेशनच्या कार्याला सुरुवात झाली. यासाठी पुरुषोत्तम न्याती, तुषार तोतला, रवींद्र लढ्ढा, डॉ. अमित चौधरी, डॉ. स्रेहल फेगडे, चेतना नन्नवरे, राजीव नारखेडे, शरद कोत्तावार, नंदकुमा जैस्वाल, तसेच भारत विकास परिषदेचे प्रसन्न मांडे, विशाल जोशी, अमित मेनन, चेतन दहाड, प्रशांत महाजन सहकार्य करीत असतात.
एखाद्या रुग्णाकडे वॉर्ड बॉय नियुक्त करायचा असल्यास त्याला त्याचा मेहनताना दिला जातो. यातून मग सेवाही घडत असते. सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ अशा ड्युटी लावण्यात येतात. यासाठी संपर्क फाऊंडेशन १०, पहिला मजला, टूरिस्ट संकुल, नेहरु चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन पुरुषोत्तम न्याती यांनी केले.
भारत विकास परिषदेच्या माध्यमातून पुणे आणि औरंगाबाद येथे जयपूर फूट निर्मितीचा कारखाना आहे. तसेच लातूर येथे फिरते युरिनल व्हॅन कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जळगावतही नवीन काही करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. -पुरुषोत्तम न्याती
संपर्क फाऊंडेशनच्या या रुग्णसेवा उपक्रमात आणखी वाढ करण्याचा मनोदय आहे. या रुग्ण सुश्रेषेसोबत रुग्णांसाठी सर्जिकल साहित्य उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे,
-तुषार तोतला

Web Title: The contact foundation of the patient, the service sacrifice: the name of the service and the interests of the person.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव