राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादीने बुडविली सहकार चळवळ : शेखर चरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:45 PM2018-01-15T16:45:41+5:302018-01-15T16:55:58+5:30

चाळीसगाव येथे झालेल्या सहकार परिषदेत शेखर चरेगावकर यांचे टिकास्र

Congress and NCP suppressed the cooperative movement across the state: Shekhar Charegaonkar | राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादीने बुडविली सहकार चळवळ : शेखर चरेगावकर

राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादीने बुडविली सहकार चळवळ : शेखर चरेगावकर

Next
ठळक मुद्देराज्यातील ११ जिल्हा बँका अडचणीतआठ तालुक्यातील २०० पेक्षा जास्त पदाधिकाºयांची उपस्थितविविध कार्यकारी संस्था, दूध सोसायट्या यांनी आपली कार्यपद्धती जनताभिमुख करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव : दि.१५ : काँग्रेस व राष्ट्रवादी उठसुठ यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा जप करुन सहकार चळवळ नेस्तानाबूत केली जात असल्याची हाकाटी पिटतात. मात्र त्यांनीच सहकार चळवळ मोडून काढल्याची टिका महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी येथे केली.
सोमवारी राजपूत मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता झालेल्या सहकार परिषदेत चरेगावकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपिठावर आमदार उन्मेष पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला, संघाचे सहसंघटन मंत्री दिलीप पाटील, जनसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पोतदार, लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते. चाळीसगावच्या जनसेवा पतसंस्था व सहकार भारती शाखेने या परिषदेचे स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन केले होते. परिषदेला आठ तालुक्यातील २०० हून अधिक सहकारी संस्थांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.
राज्यातील ११ जिल्हा बँका अडचणीत
चरेगावकर यांनी केंद्र व राज्य सरकार सहकार चळवळीचे बळकटीकरण करीत असून यासाठी गेल्या तीन वर्षात घेतलेल्या निर्णयांची सखोल माहिती त्यांनी दिली. ५१ कोटींचा डिव्हीडंड वाटप, अडचणीतील जिल्हा बँकांना मदत, ९७ वी घटना दुरुस्ती असे क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतले. तीन वर्षांपूर्वी २८ जिल्हा बँका अडचणीत होत्या. सद्यस्थितीत ही संख्या ११ वर आली आहे. विरोधकांनी शिखर बँकेलाही नख लावले. तेच विरोधक आता सरकारचे धोरण सहकार विरोधी असल्याचा गळा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत टिकायचे तर तंत्रस्नेही बना
सहकारी संस्थांसमोर खासगी संस्थांचे प्रबळ आवाहन उभे राहिले आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आपली वहिवाट सोडून नव्या मार्गाने मार्गक्रमण करावे लागणार आहे. असे सांगतांनाच शेखर चरेगावकर यांनी व्यवसायिक दृष्टीकोन, संस्थांचे यांत्रिकीकरण, सहकारातंर्गत सहकार, अद्ययावत प्रशिक्षणे घेण्याची तयारी असे बदल स्विकारले पाहिजे, असा मंत्रही त्यांनी यावेळी दिला.
आपल्याकडे सहकारातही राजकारण
जागतिक पातळीवर सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक आहे. आपल्याकडे त्यात राजकारण पाहिले जाते. जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था अडचणीत असल्याचे चित्र उभे केले जाते. अर्थात ते काहीअंशी खरे असले तरी याच जिल्ह्यात भरीव काम करणा-या संस्था देखील आहेत. गाव पातळीवरील विविध कार्यकारी संस्था, दूध सोसायट्या यांनी आपली कार्यपद्धती जनताभिमुख करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रयोगशिलतेवर मंथन व्हावे
सहकार चळवळीत कुणी काय केले. यापेक्षा नवीन प्रयोगशिल काय करता येईल, यावर मंथन झाले पाहिजे. नविन संकल्प घेऊन सहकार बळकट करण्यासाठी कटिबद्ध झाले तरच ही चळवळ टिकेल आणि समृद्ध होईल. असे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण अमृतकार यांनी केले.

Web Title: Congress and NCP suppressed the cooperative movement across the state: Shekhar Charegaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.