जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 05:25 PM2019-07-17T17:25:48+5:302019-07-17T17:26:23+5:30

मनपा प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Congress aggression on the issue of Jalgaon pothole: Mama, what happened to your promise ..Juli swear, false promise | जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

Next

जळगाव - शहरातील खड्ड्यांमुळे होणारा जनसामान्यांना त्रास व त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना झोपलेल्या मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा विरोधात बुधवारी कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून मनपासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात खड्डेुमुक्त शहरासाठी दिलेल्या आश्वासनाबाबत देखील आठवण करून देत ‘मामा, क्या हुआ तेरा वादा, झुठी कसम, झुठा वादा’ अशा घोषणा देत मनपा परिसर दणाणून सोडला.
कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनापासून मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंगला पाटील, योगेश देसले, स्वामी रेणापुरकर यांच्यासह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टॉवर चौक, इच्छापुर्ती गणेश मंदिर, गोलाणी मार्केटमार्गे ही अंत्ययात्रा काढून मनपाच्या प्रवेशव्दारासमोर समारोप करण्यात आला.
मनपा प्रशासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करा
मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. तसेच अनेकांचा खड्डयांमुळे जीव गेला असून, या मृत्यूंना मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर ३०२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉँग्रेसकडून करण्यात आली. मनपा प्रशासन मुर्दाबाद, सत्ताधारी मुर्दाबादच्या जोरदार घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडण्यात आल्या.
चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची
आमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ‘ चिड येते ना खड्डयांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची’ या मथळ्याखाली शहरभर बॅनर लावले होते. याच बॅनरचा आधार घेत कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आमदारांचीच घोषणा त्यांच्यावर उलटवत मनपासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सत्ताधाºयांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘किती जणांचे बळी घेणार’ अशा घोषणांचे फलकदेखील यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा हातात होते. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात न केल्यास मनपावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिला.
आयुक्तांना दिले निवेदन
यावेळी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह रहिवाशी भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, जेथे डांबरीकरण शक्य नाही तेथे रस्त्यांचे सपाटीकरण करून खडी कच टाकून खड्डे तातडीने दुरुस्त व्हावेत, शहरातील साफसफाई असमाधानकारक असून, सहा महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या घंटागाड्या कार्यरत कराव्यात ,जेणेकरून स्वच्छता नीट होईल व शहरात अनेक भागात पथदिवे नादुरुस्त आहेत .ते तातडीने सुरु करावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

Web Title: Congress aggression on the issue of Jalgaon pothole: Mama, what happened to your promise ..Juli swear, false promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव