जामनेर येथे संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने सातबारा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:38 PM2019-03-22T18:38:17+5:302019-03-22T18:38:28+5:30

दोन दिवसांपासून तक्रारी

The computer system at Jamner is found to be seven-fold due to jam | जामनेर येथे संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने सातबारा मिळेना

जामनेर येथे संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने सातबारा मिळेना

Next

जामनेर - येथे आॅनलाईन सातबारा उताऱ्याची संगणकीय प्रणाली ठप्प झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांना उतारे मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. तूर व हरभरा खरेदी सुरु झाल्याने नावनोंदणीसाठी सातबारा उतारा जोडणे गरजेचे आहे. या बरोबरच इतरही कामांसाठी उताºयाची गरज पडत असल्याने शेतकरी तलाठी कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र संगणकीय प्रणालीतच बिघाड झाल्याने उतारे निघत नसल्याचे सांगितले जाते. तलाठी कार्यालयाबाहेर ‘आजपासून काही दिवस आॅनलाईन बंद असल्याने ई महाभूमीच्या उताºयावर सही मिळणार नाही’ असा मजकूर असलेली नोटीस लावली असून कार्यालय बंद आहे.

Web Title: The computer system at Jamner is found to be seven-fold due to jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव