जळगाव जिल्ह्यात ‘हगणदारीमुक्ती’चे उद्दीष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:28 PM2018-03-22T12:28:32+5:302018-03-22T12:28:32+5:30

आढावा बैठक

Complete the toilet target | जळगाव जिल्ह्यात ‘हगणदारीमुक्ती’चे उद्दीष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यात ‘हगणदारीमुक्ती’चे उद्दीष्ट ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

Next
ठळक मुद्देअस्मिता योजनेविषयी जनजागृती वाढविण्याचे निर्देशआधार सेवा केंद्रामार्फत नोंदणी

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - स्वच्छ भारत अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात हगणदारीमुक्तीचे कामे अद्याप १०० टक्के झाले नसून ते ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त एस.एस. माने यांनी जि.प.च्या अधिकाऱ्यांना दिला. या वेळी त्यांनी विविध कामांचाही आढावा घेतला.
विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत बुधवारी नाशिक येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर हे उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेताना जळगाव जिल्ह्यात अद्याप ७१ हजार शौचालयांचे काम बाकी असल्याचे जि.प.च्यावतीने सांगण्यात आले. आयुक्त माने यांनी ही कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी सीईओ दिवेकर यांनी ३१ पर्यंत ४० हजार शौचालयांचे कामे पूर्ण होतील व उर्वरित कामे १४ एप्रिलपर्यंत पूर्ण करू असे सांगितले.
अस्मिता योजनेविषयी जनजागृती वाढविण्याचे निर्देश
या वेळी माने यांनी अस्मिता योजनेविषयी जनजागृती वाढविण्याचेही निर्देश दिले. योजनेच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च पर्यंत ‘पॅडमॅन’ चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्याविषयीदेखील सूचना दिल्या. या सोबतच ज्यांच्यामार्फत सॅनेटरी नॅपकीन वाटप केले जाणार त्यांना सूचना द्याव्या व येणाºया त्रुटींची नोंद करण्याविषयीदेखील सूचित करण्यात आले. ७ एप्रिलपर्यंत ११ ते १९ वयोगटातील मुलींना योजनेचे ओळखपत्र देण्याविषयीदेखील सूचना देण्यात आल्या.
२३ रोजी आधार सेवा केंद्रामार्फत अशा मुलींची नोंदणी कार्यक्रम आखला असल्याचे सीईओ दिवेकर यांनी सांगितले.
या वेळी विविध योजनांचाही आढावा आयुक्त माने यांनी घेतला.

Web Title: Complete the toilet target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.