पहूरच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:33 PM2019-06-19T16:33:57+5:302019-06-19T16:34:45+5:30

वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Complete survey for Waghur water supply scheme | पहूरच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण

पहूरच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण पूर्ण

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळापेठ व कसबे ग्रामपंचायतीकडून साडेबत्तीस कोटींचा प्रकल्प अहवाल दाखल

मनोज जोशी
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : वाघूर धरणावरून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ३२ कोटी ४३ लाख ८४ हजार आठशे साठ एवढ्या निधीचा प्रकल्प अहवाल दाखल केला आहे. यासंदर्भात पेठ व कसबे गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पहूर गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पहूर पेठ व कसबे सामुदायिक पाणीपुरवठा समिती गठित झाली आहे. २०१५ पासून शासनस्तरावर समीतीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायत व कसबे ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे प्रकल्प अहवाल सादर केला आहे. औरंगाबाद येथील अभियंता समीर जोशी यांच्याकडून दोन्ही गावात सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र योजनेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वतंत्र शाखा अभियंता नियुक्ती ची मागणी
या प्रकल्पाचे काम वेगाने होण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्ती करण्याची मागणी समिती अध्यक्ष बाबूराव घोंगडे, उपाध्यक्षा तथा पेठ येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, कसबे येथील सरपंच ज्योती शंकर घोंगडे, सचिव अरूण घोलप, उपसरपंच श्यामराव सावळे, उपसरपंच योगेश भडांगे, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, रामेश्वर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, दौलत घोलप, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, विवेक जाधव, पुंडलिक भडांगे, अ‍ॅड. एस.आर पाटील, अर्जुन लाहसे या समिती सदस्यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
पाणीटंचाईच्या झळा
दरवर्षी पहूर गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा जून अर्धा होऊनही वरूणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. मोतीआई धरणाच्या मृत साठ्यातून अल्पसा शिल्लक पाणीसाठ्यातून कसबे व पेठ गावाची तहान भागविताना ग्रामपंचायतींना दमछाक करावी लागत आहे. वेळेप्रसंगी छोट्या मोठ्या वादाच्या घटनांना दोन्ही गावच्या सरपंचाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेही महत्वाकांक्षी योजना लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाघूर धरणावरून पेठ व कसबे गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी समीतीच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, दोन्ही गावांतील सर्वेक्षणाचे कामपूर्ण केले आहे. त्याचबरोबर दोन्ही ग्रामपंचायतीकडून ३२ कोटी ४३ लाख निधीच्या प्रकल्पाचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे नुकताच दाखल केला आहे. या योजनेचे काम जलद गतीने होण्याकरिता स्वतंत्र शाखा अभियंता यांची नियुक्तीची मागणी समीतीकडून केली आहे. यासाठी जलसंपदा मंत्र्यांनीही मुख्य अभियंता नाशिक यांना आदेशित करून तातडीने नियुक्तीच्या सूचना दिल्या आहेत. -बाबूराव घोंगडे, पेठ व कसबे सामूहिक पाणीपुरवठा समिती, अध्यक्ष, पहूर
 

Web Title: Complete survey for Waghur water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.