बॅँकेतूनच पुरविला चोरट्यांना ग्राहकांचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:06 PM2019-04-20T22:06:42+5:302019-04-20T22:08:07+5:30

कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन गंडा घालणाºया दिल्लीच्या टोळीला शहरातील एका बॅँकेतूनच डाटा पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच संगणकावर बॅँकेचे खाते खुले करुन त्याचा फोटोच या संशयिताला पाठविण्यात आला असून ते फोटाच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता बॅँकेचे कर्मचारी रडारवर आले आहे.

Client data to the thieves provided through the bank | बॅँकेतूनच पुरविला चोरट्यांना ग्राहकांचा डाटा

बॅँकेतूनच पुरविला चोरट्यांना ग्राहकांचा डाटा

Next
ठळक मुद्दे  सायबर क्राईम  दिल्लीचे संशयित कारागृहात

जळगाव : कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन गंडा घालणाºया दिल्लीच्या टोळीला शहरातील एका बॅँकेतूनच डाटा पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच संगणकावर बॅँकेचे खाते खुले करुन त्याचा फोटोच या संशयिताला पाठविण्यात आला असून ते फोटाच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता बॅँकेचे कर्मचारी रडारवर आले आहे.
चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत डॉ. अजय ओंकारनाथ दहाड यांना एटीएमकार्डचे पैसे करत असल्याचा बहाणा करुन संशयिताने १ लाख ६६  हजार ८०० रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दिल्ली येथील कॉल सेंटरचा पदार्फाश केला होता. तसेच मास्टरमाईंड भुपेंदर सिंग कुमार मुकेश कुमार (२०), अमन लांबा बालकिशन लांबा (२१ ), राहूल कौशिक सुरेश कुमार (२१) व नितीन राकेश टंडन (२४) या चौघांना अटक केली होती. शनिवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
इतरांनाही क्रेडीट कार्डव्दारे सव्वा लाखात गंडा
अटकेतील संशयितांकडे तीन बँकेची क्रेडीत कार्ड मिळून आले आहे. याकार्डव्दारे संशयितांनी एकूण ६ लाख २० हजार ९००  रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे क्रेडीट कार्ड कोणाच्या मालकीचे आहेत, ही माहिती  बँकेकडून प्राप्त करावयाची असून संबंधित मोबाईल व साहित्य संशयितांकडून हस्तगत करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरु केली आहे. 

 

Web Title: Client data to the thieves provided through the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.