पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:08 PM2017-08-21T17:08:09+5:302017-08-21T17:11:57+5:30

हिवरखेडा ता. जामनेर येथील दुर्घटनेने पोळा सणावर विरजण पडले आहे. गाव शोकसागरात बुडाले आहे.

The child who went to wash the bull on a booze drowned in the dough | पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा डोहात बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्दे मयत प्रदीप कुटुंबातील एकुलता मुलगा
कमत ऑनलाईनवाकोद जि. जळगाव, दि. 21- येथून जवळच असलेल्या हिवरखेडा दिगर ता. जामनेर येथे पोळा सणानिमित्त वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा नदीतील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावातील पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले. हिवरखेडा दिगर येथील संजय नामदेव पवार यांचा मुलगा प्रदीप हा सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोळा सणानिमित्त वाघूर नदीवर बैल धुण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने वाघूर नदीला ब:यापैकी पूर आलेला आहे. प्रदीप हा बैलांना धूत असतांना अचानक नदीत असलेल्या खोल डोहात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दु:खद वार्ता कळताच गांवावर शोककळा पसरली आहे . प्रदीप हा जामनेर येथील धाडीवाल महाविद्यालयातील 11 वी कॉमर्सचा विद्यार्थी होता.नदीला काही तासांपूर्वीच आले होते पाणी पावसाने दडी मारल्याने कित्येक दिवसांपासून कोरडी असलेल्या वाघूर नदीत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने काही तासापूर्वीच मोठे पाणी आले होते. पोळा सणाच्या दिवशीच नदी भरून वाहू लागल्याने शेतक:यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्यामुळे आपले बैल व इतर गुरे ढोरे धुण्यासाठी त्यांची पावले आपोआप नदीकडे वळली होती. तर पोळ्यानिमित्त गावात सर्जा- राजाच्या पुजेची आणि त्यांना सजविण्याच्या तयारीत बळीराजा मगA असतांनाच ही दु:खद वार्ता धडकल्याने शोकाकूल वातावरण निर्माण झाले.

Web Title: The child who went to wash the bull on a booze drowned in the dough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.