चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:39 PM2019-07-14T23:39:16+5:302019-07-14T23:39:49+5:30

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे ...

Chaturmas is the festival of grace | चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

Next

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे प्रभू महावीर वर्धमान स्वामीने शास्त्रात सांगितले आहे. आषाढ म्हणजे अषढ-षटरिपूंपासून आत्म्याची सुटका. श्रावण म्हणजे श्रवण करणारे, प्रवचन ऐकणारे बना. भाद्रपद म्हणजे भद्रपद - सरल बना. अश्वीन म्हणजे अश्वीनीकुमार - स्वत:चे डॉक्टर स्वत: बना. तात्पर्य स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. कार्तिक म्हणजे करा त्रिक - सम्यक दर्शन सम्पक ज्ञान, समक चरित्र जीवनात जोपासा. या चार महिन्यात ज्याने सद्गुरुंच्या सान्निध्यात किंवा मार्गदर्शनाने धर्म केला त्याचे कल्याण सुनिश्चित आहे.
जसे शेतकरी पावसाळ्यात राबराब राबतो, आठ महिन्यांची कमाई चार महिन्यात करतो, तसेच पुण्यात्म्यानी चातुर्मासात धर्म केला तर झाला आठ महिने सुख-शांती मिळते. धर्म म्हटला म्हणजे तप-त्यागाने जीवन सुगंधीत करणे होय. दंभाला तिथे थारा नाही, लोभाला स्थान नाही. फक्त आणि फक्त आत्म ध्यान असते. आत्म गुण विकास, गुणांची शुध्दी, गुणांची प्राप्ती म्हणजेच धर्म होय. आत्मा अनंतगुणांनी भरलेला आहे. चार महिन्यांचा हा कालावधी आपली मनाची स्थिरता वाढविणे आणि आपल्या चेतनामध्ये स्थिरता करून घेण्याचे श्रेष्ठ माध्यम ध्यान असते. स्वाध्याय, जप आणि तपाने आपली आत्मा शुध्द करण्याचा हा काळ असण्यासह चातुर्मास काळ म्हणजे आराधनेचा पवित्र काळ आहे.
- मुनीप्रवर श्री मोक्षरक्षित विजयश्री महाराज

Web Title: Chaturmas is the festival of grace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.