रुसवेफुगवे दूर करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 08:47 PM2019-03-24T20:47:40+5:302019-03-24T20:50:07+5:30

ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले जाईल, असे वातावरण तयार झाले होतेच. पण भाजपाचे तिकीट कोणाला मिळेल, यासाठी मोठी चुरस होती. प्रथमदर्शनी तरी असे दिसते आहे की, ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांची इच्छा डावलून पक्षश्रेष्ठींनी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वाघ यांच्या पारड्यात वजन टाकल्याने हे शक्य झाल्याची चर्चा आहे. जळगावचे पालकमंत्रिपद अद्याप महाजन यांना मिळालेले नाही, त्यात उमेदवारीची शिफारस डावलली जाणे, हा सूचक इशारा म्हणावा लागेल.

Challenge the candidates to remove Russwefugew | रुसवेफुगवे दूर करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान

रुसवेफुगवे दूर करण्याचे उमेदवारांपुढे आव्हान

Next
ठळक मुद्देएकनाथराव खडसे यांच्या मदतीसाठी तर काँग्रेस-राष्टÑवादीचा जागावाटप व उमेदवारीचा घोळ नाही ना?ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करण्याचे भाजपापुढे मोठे आव्हान ; तिन्ही मतदारसंघात काट्याची लढत निश्चित

मिलिंद कुलकर्णी

यंदाच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे वगळता कोणत्याही पक्षाचे तिकीट अपेक्षितपणे मिळालेले नाही. रावेरमध्ये तर अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. अद्याप हा मतदारसंघ कोणी लढवायचा याबद्दल घोळ सुरु आहे. त्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरणार आहे. अवघे २९ दिवस हाती असताना काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेससारखे राष्टÑीय पक्ष एवढा घोळ घालतात, याचा अर्थ काय समजायचा. खडसे यांच्याविषयी एवढे प्रेम असेल तर बिनविरोध करुन टाका ना, असाच सूर आता आहे.
लोकसभा निवडणुकीत रावेरमधील कॉंग्रेस आघाडीतील घोळ वगळता चारही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. २३ व २९ एप्रिल अशा दोन तारखांना मतदान आहे. महिन्याचा कालावधी उरला आहे. लोकसभा मतदारसंघ म्हणजे ६ विधानसभा मतदारसंघ, किमान ७ ते ८ तालुके असे मोठे कार्यक्षेत्र आहे. संघटन मजबूत असेल तरच कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचता येते.
नंदुरबारात भाजपाच्या डॉ.हीना गावीत यांचे तिकिट निश्चित होते, त्यामुळे त्यांचा संपर्क बऱ्यापैकी झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनीही संपर्क मोहीम राबविली होती, परंतु मध्येच माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत हे पुत्रासाठी सक्रीय झाल्याने पाडवी यांची मोहीम थांबलेली होती. आता नवापूरकरांची नाराजी दूर करण्याचे आणि साक्री या धुळे जिल्ह्यातील मतदारसंघात संपर्क वाढविण्याचे मोठे आव्हान आता पाडवी यांच्यापुढे राहणार आहे. नवापूरचे राष्टÑवादीचे माजी आमदार शरद गावीत व जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत हे भाजपा उमेदवारांचे काका आहेत. शरद गावीत यांनी नुकतीच डॉ.विजयकुमार गावीत यांची भेट घेतली. त्यामुळे राष्टÑवादीचे सहकार्य मिळविण्यासाठी पाडवी यांना प्रयत्न करावे लागणार आहे. तिकडे डॉ.हीना गावीत यांनी शिवसेनेसोबत संयुक्त मेळावा घेऊन युती भक्कम असल्याचे वातावरण तयार केले आहे.
धुळ्यात रोहिदास पाटील यांच्याऐवजी आमदार कुणाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यापुढील आव्हानात भर पडली आहे. स्वकीय आमदार अनिल गोटे आणि शिवसेना या दोघांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना शिकस्त करावी लागेल.
जळगावात भाजपाचे भाकरी फिरविली. अंतर्गत स्पर्धेतून स्मिता वाघ यांनी उमेदवारी पटकावली असली तरी त्यांच्या गृहतालुका अमळनेर, पारोळा या दोन ठिकाणी उठलेले वादळ शांत करण्याची कामगिरी त्यांना प्राधान्याने करावी लागेल. राष्टÑवादीचे गुलाबराव देवकर यांनी आघाडीच्या माध्यमातून अल्पावधीत चांगले संपर्क अभियान राबविले.
रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या उमेदवारीविषयी असलेला संभ्रम दूर झाला. एकनाथराव खडसे यांना ऐन निवडणुकीत दुखवायचे नाही या हेतूने आणि एकेक जागेचे महत्त्व लक्षात घेऊन रावेरमध्ये कोणताही प्रयोग भाजपाकडून झाला नाही. कॉंग्रेस आघाडीतील जागावाटपाचा घोळ खडसे यांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला विरोध त्यांच्यादृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. नाराज मंडळींचे रुसवे फुगवे काढण्यात हा आठवडा जाणार असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.

Web Title: Challenge the candidates to remove Russwefugew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव