ठळक मुद्देजनजागृती अभियान सुरूचीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद कराआवाहनाला मिळतोय प्रतिसाद

लोकमत ऑनलाईन जळगाव, दि.13- एकीकडे पाक पुरस्कृत दहशतवादाला पाठबळ देणारा, अरूणाचल प्रदेशवर सातत्याने दावा सांगणार चीन जागतिकस्तरावरही सातत्याने भारताला विरोध करीत आहे. दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्यासाठी व्यापार युद्धही करतो आहे. त्या चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वदेश सुरक्षा अभियानाचे अखिल भारतीय प्रमुख सतीशकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केले. तर स्वदेशी जागरण मंच व समविचारी संघटनांतर्फे सुरू केलेले राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियानात जिलत 7 ते 21 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येत असल्याची माहिती मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी दिली. यावेळी मंचचे जिल्हा संयोजक विशाल चोरडिया, जिल्हा कार्यवाहक किशोर चौधरी देखील उपस्थित होते. सतीशकुमार यांनी सांगितले की, 1962च्या युद्धात आपला 37 हजार 500 चौ.किमी भूभाग चीनने बळकावला आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिरातील 5180 चौ.किमी भूभाग पाकिस्तानकडून परस्पर चीनला मिळाला आहे. अरूणाचल व लडाखमधील 90 हजार चौ.किमी भूभागावर चीन दावा सांगत आहे. वर्षातून 400 ते 500 वेळा चीन आपल्या प्रदेशात घुसखोरी करतो. भारताला राष्ट्रीय सुरक्षा परिषद तसेच न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा सदस्य बनण्यात चीनच अडथळे आणत आहे. दुसरीकडे चीनने भारताशी व्यापार युद्ध सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठेवर कब्जा करून कमी किंमतीत वस्तू विकत असल्याने लाखो रोजगार भारतातून चीनकडे गेले आहेत. चीनमधून भारतात दरवर्षी सुमारे 6 लाख कोटीच्या मालाची आयात होते. तर भारतातून त्या तुलनेत अल्प निर्यात होते. यात तब्बल 52 टक्कय़ांची तफावत आहे. चीनमधील 60 टक्के उद्योग निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद करून त्या मालावर पूर्णपणे बहिष्कार टाकणे हाच सवरेत्तम उपाय आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियान राबविले जात असल्याचे सांगितले. जनजागृती अभियान सुरू स्वदेशी जागरण मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 7 ते 21 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जात आहे. त्यात स्वाक्षरी अभियान, व्याख्यान, कोपरा सभा, प्रतिज्ञा घेणे, पत्रक वाटप असे विविध उपक्रम राबवून स्वदेशी वापरा, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका असे आवाहन केले जात आहे. महिलाच प्रामुख्याने खरेदी करतात.त्यामुळे महिलांमध्येही जनजागृती करण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.