प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:44 PM2018-03-19T12:44:06+5:302018-03-19T12:44:06+5:30

व्यापाऱ्यांना अद्यापही सूचना नाही

Businessman confusion about plastic ban | प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात

प्लॅस्टिक बंदीसंदर्भात जळगावातील व्यापारी वर्ग संभ्रमात

Next
ठळक मुद्देकायदा नसताना अंमलबजावणी कशी ? उपलब्ध साठा, कर्जफेड व भविष्याबाबत चिंतीत

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १९ - राज्य सरकारने प्लॅस्टिक वस्तू बंदीची घोषणा करून १८ मार्चपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचेही जाहीर केले, मात्र या बाबत व्यापाºयांना अद्यापही कोणत्याच सूचना नसल्याने व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे. या बाबत कायदाच केला नसल्याने त्याची अंमलबजावणी कशी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वीच प्लॅस्टिक वस्तूंवर बंदीची घोषणा केली व १८ मार्चपासून त्याची अंमलबजावणीही होणार असल्याचे सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे शहरातील उद्योजक व व्यापारी वर्ग संभ्रमात पडला असून उपलब्ध साठा, कर्जफेड व भविष्याबाबत चिंतीत झाला आहे.
१८पासून अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितल्याने व्यापाºयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. एकीकडे कोणत्याच सूचना दिलेल्या नाही की अधिकाºयांमार्फत कळविलेले नाही. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी बाबत काय करावे, अशा चिंतेत व्यापारी आहेत. १८ रोजी रविवार असल्याने दुकाने बंद होती. मात्र सोमवारी नेमके काय करावे, अशा विवंचनेत व्यापारी आहेत.
कायदा नसताना अंमलबजावणी कशी ?
सरकार या बाबत केवळ घोषणा करीत आहे. मात्र प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कायदा करण्यासाठी ठराविक कालमर्यादा असते, मात्र तसे सरकारने काहीही न करता प्लॅस्टिक बंदीची अंमलबाजणी कशी करता येईल, असाही सूर उमटत आहे.
सरकारने उद्योजक, व्यापारी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Businessman confusion about plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.