शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:27 PM2019-03-22T18:27:59+5:302019-03-22T18:28:10+5:30

पातोंडा, ता. चाळीसगाव - येथील शेतकरी माधव सजन रोकडे व तुकाराम सजन रोकडे या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या ऊसाला शॉर्ट ...

Burning sugar cane due to short circuit | शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक

Next

पातोंडा, ता. चाळीसगाव - येथील शेतकरी माधव सजन रोकडे व तुकाराम सजन रोकडे या शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतातील संपूर्ण ऊस, ठिबक संच असे साहित्य जळून खाक झाले. सुमारे तीन लाखाच्या उसाचे व एक लाखाच्या ठिबकचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंब बोलाविण्यात आले, मात्र तो पर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. तलाठी एस. बी . पवार, कोतवाल विठोबा माळी, पोलीस पाटील शरद महाजन यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Burning sugar cane due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव