जळगावातील गेंदालाल मील परिसरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:19 PM2018-06-22T20:19:52+5:302018-06-22T20:21:37+5:30

गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़

Bunker in the Gondalal Mile area of ​​Jalgaon | जळगावातील गेंदालाल मील परिसरात घरफोडी

जळगावातील गेंदालाल मील परिसरात घरफोडी

Next
ठळक मुद्देकुलूप तोडून चोरट्यांचा घरात प्रवेशशुक्रवारी सकाळी सहा वाजता घटना७१ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास

जळगाव- गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़
लाकुड पेठेतील रहिवासी शेख जसीम शेख शरीफ हे कुटुंबियांसह राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. गुरुवारी रात्री शेख व त्यांची आई जवळच राहत असलेल्या नातेवाईक अफसाना शेख यांच्याकडे झोपण्यासाठी गेले़ ही संधी साधत चोरट्यांनी रात्री घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून कपाटातील ३१ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा हार, तसेच १ तोळ्यांचा सोन्याचा मंगळसुत्र व १० हजार रूपयांची रोकड असा ७१ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़
जसीम यांचे भाऊ समीर हे सकाळी घरी परतले़ यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचा कुलूप तुटलेला व दार उघडे दिसले़ घरातील सामानाची पाहणी केली असता त्यात सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांना दिसले़ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Bunker in the Gondalal Mile area of ​​Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.