वधूस भाऊ नसल्याने शेवंतीच्या मिरवणुकीत घोड्यावर बसली बहीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:30 PM2018-02-08T19:30:49+5:302018-02-08T19:39:04+5:30

वधूस भाऊ नसल्याने शेवतीच्या मिरणवणुकीत तिच्या बहिणीला घोड्यावर बसवून ‘ सुख्या’ बनण्याचा मान देत परंपरेला फाटा देण्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील सनपुले येथे घडला.

Since the bride is not a brother, the sister sitting on a horse-to procession | वधूस भाऊ नसल्याने शेवंतीच्या मिरवणुकीत घोड्यावर बसली बहीण

वधूस भाऊ नसल्याने शेवंतीच्या मिरवणुकीत घोड्यावर बसली बहीण

Next
ठळक मुद्देसनपुले येथील अनोख्या घटनेचे सर्वस्तरातून स्वागतमुलगा- मुलगी एक समानचा कृतीतून संदेशज्ञानेश्वरी बनली वधू बहिणीचा ‘सुख्या’

लोकमत आॅनलाईन
चोपडा, दि.८ : वधूस भाऊ नसल्याने लग्नात शेवंतीच्या मिरवणुकीत तिच्या लहान बहिणीला ‘सुख्या’ बनवून तिला घोड्यावर बसण्याचा मान देऊन मुलगा- मुलगी एक समान असा विधायक संदेश देण्याचा प्रकार तालुक्यातील सनपुले येथे नुकताच घडला. परंपरेला फाटा देत नवा पायंडा निर्माण करण्याच्या या प्रयत्नाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
जगात मुलांबरोबर मुलींनाही समान अधिकार आहेत ही नवीन गोष्ट नाही. याची प्रचिती आता भारतातही चोहीकडे येत आहे. प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुलीदेखील आघाडीवर आहेत. मात्र लग्न सोहळ्यात शेवंतीच्या वरातीत वधू मुलीचा भाऊ घोड्यावर बसून पारावर जातो ही परंपरा आजही कायम आहे. तथापि या परंपरेला फाटा देत घोड्यावर मुलाऐवजी मुलगी बसून पारावर गेली. हा अनोखा सोहळा सनपूले ता. चोपडा येथील एका विवाह समारंभात नुकताच पहावयास मिळाला.
सनपूले येथील नामदेव अंकुश मोरे यांचा मुलगा जगदीश याचा विवाह कुसुंबा ता. धुळे येथील ज्ञानेश्वर धुडकू महाले यांची कन्या सुषमा हिच्याशी नुकताच संपन्न झाला. (वर जगदीश हा पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीस आहे तर वधूचे पिता शेतमजूर आहेत.)
विवाह सोहळा म्हटला की पारावर नवरदेवाला घेण्यासाठी शेवंतीच्या वरातीत घोड्यावर वधूचा भाऊ बसून येतो. ही पारंपरिक पद्धत आहे. मात्र नवरी मुलीस भाऊ नाही. त्या पाच बहिणी आहेत. त्यामुळे या परंपरेला फाटा देत वधूची लहान बहीण ज्ञानेश्वरी (तनू) ही घोड्यावर बसून शेवंतीच्या वरातीत वाजत गाजत पारावर गेली . परंपरेला छेद देणाºया या घटनेचे स्वागत विवाहास उपस्थित संपूर्ण चर्मकार बांधव व इतर समाजबांधवांनी केले आहे.


 

Web Title: Since the bride is not a brother, the sister sitting on a horse-to procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव