मुलगा सारखी चिडचिडच करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:12 PM2018-03-15T13:12:49+5:302018-03-15T13:12:49+5:30

The boy is irritated | मुलगा सारखी चिडचिडच करतो

मुलगा सारखी चिडचिडच करतो

Next

तुम्हाला सांगते डॉक्टर, आमचा सोनू तसा खूप हुशार, समजदारही म्हणा हवं तर. पण सध्या फारच चिडचिड करतोय. काहीही विचारा चांगलं-वाईट; चिडूनच उत्तर मिळणार. कैकवेळा विचारले, काय झाले चिडायला? तर काही नाही हे उत्तर ठरलेलेच. असा का बरं वागत असेल हा? सोनूच्या आईला पडलेला हा प्रश्न बहुतेक पालकांना पडलेला असतो.
मुलांची होणारी चिडचिड बहुतेक पालकांना एकतर अनाठायी वाटते. नाही तर खूपच गंभीर वाटते. काही काही पालकांना असेही वाटते की, मुलगा हाताबाहेर चाललाय किंवा त्याला आपले सांगणे आवडत नाही. कित्येक पालकांना असे वाटते की, हा मूळातूनच चिडका आहे. त्यामुळे तसा शिक्का मारायलाही ते कमी करत नाहीत. समजदार पालकांना वाटते, आपले तर काही चुकत नाही ना? ते मुलांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात पण बहुधा असफलच होतात.
मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता एखाद्या मुलाची चिडचिड होणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असते. हे अस्वास्थ्य अनेकविध कारणामुळे असू शकते.
झपाट्याने होणारी वाढ
मुलांची वाढ ही फारच झपाट्याने होत असते. त्यामुळे जे शारीरिक बदल होतात त्यास जुळवून घेणे कित्येकदा मुलांना अवघड जाते. नवीन फुटलेल्या मिशा, गालावर येणारे पुरळ, मुलींमध्ये वा मुलांमध्ये होणारे लैंगिक अवयवातील बदल इत्यादी. आपण मोठे होत आहोत ही भावना निर्माण तर होते. पण त्याचबरोबर लज्जेची भावनाही निर्माण होत असते. जी मुलाच्या चिडचिडपणाला कारण ठरते.
शालेय ताणतणाव
शालेय जीवन मुलांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते. त्याचा मुलांच्या भावजीवनावर ताण पडत असतो. हा ताण वय व वर्गानुसार भिन्नभिन्न असतो. उदा.शिशुला शाळेत आईपासून आपण दूर कसे राहणार हा ताण असतो, तर थोड्या मोठ्या बालकाला वर्गात शिक्षक वा वर्गमित्र कसे वागणार याचा ताण असतो. याशिवाय काही काही मुलांना करिअर व टक्केवारीचा ताण असतो. त्याच्याशी जुळवताना जी कसरत चालते त्यातून चिडचिडपणा निर्माण होण्याची शक्यता असते.
- डॉ.नीरज देव

Web Title: The boy is irritated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव