ठळक मुद्देगुजरातमधील बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी गोंदेगाव ता. जामनेर येथील शिरीष कुळकणी यांची निवडभूमीपुत्राचा गावकºयांकडून हृद सत्कार

आॅनलाईन लोकमत शेंदुर्णी ता. जामनेर, दि.१२ : गोंदेगाव ता. जामनेरचे सुपुत्र आणि बडोदा येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू शिरीष कुळकर्णी हे नुकतेच आपल्या गावी आले असता त्यांचा गावकºयांकडून हृद सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना कुलगुरू कुळकर्णी यांनी आजवर माझे कर्मभूमीत (गुजरात राज्यात) भरपूर सत्कार झाले. पण जन्मभूमीत झालेल्या आजच्या सत्काराने आपण भारावलो, असल्याचे त्यांनी नमुद केले. या प्रसंगी जुने दिवस, मित्र परिवार व कष्टाचे दिवस यांना उजाळा देण्यात आला. कुळकर्णी पुढे म्हणाले की, जन्मभूमीत झालेल्या या सत्काराचे मी आभार मानणार नाही. त्या ऋणातच रहायला मला आवडेल. कार्यक्रमाला पं. स. चे माजी सभापती किशोर पाटील, अशोक ओटे, भागवत पाटील, पोलिस पाटील विलास खाकरे, उत्तमराव थोरात, डॉ. विजयानंद कुलकर्णी, सुभाष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड, कौतिक खाकरे, देवानंद कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, गोविंद मगरे, राजू तडवी, माजी सरपंच सुरेश खाकरे, वसंत पाटील, बापू बोदडे, कृष्ण शेवतकर, विजू शेवतकर, तुकाराम गेठे, संजय चौधरी, तुकाराम सुलताने, आबा पवार, संकेत कुलकर्णी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. असा झाला कुलगुरूपदापर्यंतचा प्रवास शेंदुर्णीनजीकच्या गोंदेगाव येथे प्राथमिक , गरुड विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या शिरीष रामचंद्र कुलकर्णी यांचे शालेय जीवन नाजूक आर्थिक स्थितीमुळे खडतर गेले. परंतु उच्च ध्येय बाळगून असलेल्या कुळकर्णी यांनी कठीण परिस्थितीवर मात केली. कुलकर्णी हे ३५ वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे घराबाहेर पडले. या दरम्यान त्यांनी मिळेल ती कामे केली. हमाली केली, सिनेमाची पोस्टर्स लावली. शिक्षणही सुरू ठेवले आणि प्राध्यापक झाले. दरम्यान डॉक्टरेट मिळवली. प्राध्यापकपदापासून सुरू झालेली त्यांची शैक्षणिक कारकीर्द आज बडोदा येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंत येऊन पोहचली आहे. कुशाग्र बुद्धी आणि मेहनतीच्या बळावर गेल्या वर्षी त्यांना कुलगुरूपदाची संधी मिळाली. त्यामुळे गावकºयांना विशेष आनंद झाला. ते गावात आल्यानंतर गावकºयांनी त्यांचा सत्कार करून गोंदेगावच्या या सुपुत्राला सलाम केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.