बोदवड तालुक्यातील कुºहा हरदोत येथे बोगस डॉक्टरला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:18 PM2018-12-10T22:18:29+5:302018-12-10T22:19:22+5:30

बोदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यातच सोमवारी एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली.

A bogus doctor was caught at Hardoi in Budhavad taluka | बोदवड तालुक्यातील कुºहा हरदोत येथे बोगस डॉक्टरला पकडले

बोदवड तालुक्यातील कुºहा हरदोत येथे बोगस डॉक्टरला पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देगत काही दिवसांपासून सुरू होता ‘बोगसगिरी’चा प्रतापवैद्यकीय अधिकारी, पोलीस पथकाने केली कारवाई

बोदवड, जि.जळगाव : बोदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यातच सोमवारी एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली.
बोदवड तालुक्यातील कुºहा हरदो गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाºयांना मिळाली. त्यांनी एनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी योगेश्वर राजाराम पाटील यांच्यासह पाहणी करण्यासाठी कुºहा हरदो गाव गाठले. पोलीस पथकही सोबत होते. तेव्हा नामदेव माळी यांच्या खोलीत पथकाने भेट दिली. तेथे संशयित बोगस डॉक्टर आरोपी राजेश निवृत्ती शेळके हा आढळून आला. याशिवाय सुमारे अडीच हजार रुपयांचे साहित्य त्यात सुया, सलाईन, औषधी व वैद्यकीय साहित्य आढळले. त्यास वैद्यकीय अधिकाºयांनी वैद्यकीय व्यवसाय करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र मागितले. तेव्हा प्रमाणपत्रावर अस्पष्ट नाव, तसेच प्रमाणपत्राची वैधता नव्हती. या साहित्यासह पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेत बोदवड पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध भाग सहा, गुन्हा क्रमांक ३२/१८, महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ मधील कलम ३३, ३७ तसेच जिल्हाधिकाºयांकडील आदेश क्र. दंड प्र /२/कावी/२२८/२०१८ तसेच पोलीस अधीक्षक यांचे आदेश क्र. ६७१४/२०१८/दि.३/१२/२०१८ अव्यये कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस निरीक्षक राजमहेंद्र बाळदकर, उपनिरीक्षक दिलीप चौधरी, प्रवीण चौधरी, निखिल नारखेडे, ब्रिजेश पाटील, संजय भोसले, तुषार इंगळे, मुकेश पाटील, सागर वंजारी आदींचा समावेश होता.
या आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केले असता जामीनावर सोडण्यात आले आहेश्र
या कारवाईने बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: A bogus doctor was caught at Hardoi in Budhavad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.