जळगावात भाजपचे उन्मेष पाटील यांना चार लाखावर तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तीन लाखावर मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:27 PM2019-05-23T18:27:58+5:302019-05-23T18:56:19+5:30

ईव्हीएमवरील मतमोजणी संपली

BJP's Unmesh Patil in Jalgaon gets four lacs votes | जळगावात भाजपचे उन्मेष पाटील यांना चार लाखावर तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तीन लाखावर मताधिक्य

जळगावात भाजपचे उन्मेष पाटील यांना चार लाखावर तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांना तीन लाखावर मताधिक्य

Next

जळगाव : लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत जळगाव व रावेर मतदार संघाची ईव्हीएमवरील मतमोजणी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास संपली. यामध्ये जळगाव मतदार संघात २९व्या व अंतिम फेरीअखेर भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी ४ लाख ८ हजार ९७३ मतांचे मताधिक्य मिळविली आहे. त्यांना एकूण ७ लाख ७ हजार २२४ मते मिळाली. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती ती अखेर पर्यंत कायम राहिली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना२ लाख ९८ हजार २५१ मते मिळाली आहे.
रावेर मतदार संघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना अंतिम व २४व्या फेरीअखेर ३ लाख ३१ हजार ८५६ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यांना एकूण ६ लाख ४९ हजार ८८५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना ३ लाख १८ हजार ०२९ मते मिळाली आहे.

Web Title: BJP's Unmesh Patil in Jalgaon gets four lacs votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.