जळगावातही भाजपाची जोरदार मुसंडी, युतीमुळे लोकसभेतही राष्टÑवादी कॉँग्रेसला मतदारांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:45 PM2019-05-24T12:45:13+5:302019-05-24T12:45:46+5:30

विधानसभेला युतीलाच होणार फायदा

BJP's strong alliance in Jalgaon too, voters rejected the plaintiff's congress in the Lok Sabha | जळगावातही भाजपाची जोरदार मुसंडी, युतीमुळे लोकसभेतही राष्टÑवादी कॉँग्रेसला मतदारांनी नाकारले

जळगावातही भाजपाची जोरदार मुसंडी, युतीमुळे लोकसभेतही राष्टÑवादी कॉँग्रेसला मतदारांनी नाकारले

Next

अजय पाटील
जळगाव : आठ महिन्यांपूर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवत मनपात सत्ता स्थापन केली होती. हेच यश भाजपाने लोकसभेतही कायम ठेवत शहरात मोठी मुसंडी मारली.
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी मोठे मताधिक्य घेवून राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला आहे. या विजयात जळगाव शहरात भाजपाला प्रचंड आघाडी मिळाली आहे. आठ महिन्यांपुर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने ७५ पैकी ५७ जागा जिं कत स्पष्ट बहुमत मिळवत मनपात सत्ता स्थापन केली होती. हेच यश भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत कायम ठेवत मोठी मुसंडी घेतली आहे.
त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती झाल्यामुळे मनपातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या १५ नगरसेवकांनी देखील शहरात भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्यासाठी प्रचार केल्यामुळे त्याचा फायदा उन्मेश पाटील यांना झाला.
जळगाव शहरात राष्टÑवादी कॉँग्रेसचा फारसा जनाधार नाही. मनपा निवडणुकीत ४३ जागा लढविल्या होत्या. त्यात ४० जागांवरील उमेदवारांचे डिपॉजीट जप्त होवून एकही जागेवर राष्टÑवादीचे नगरसेवक विजयी झाले नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीला शहरात फारसे माताधिक्य मिळण्याची शक्यता ही नव्हतीच. मात्र, गुलाबराव देवकर हे शहरवासियांना उन्मेश पाटील यांच्यापेक्षा परिचीत होते. त्यामुळे त्यांना शहरात आघाडी मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांना कोणताही फायदा झाल्याचे या निकालात दिसून येत आहे.
सुरेशदादा जैन यांच्या पाठींब्यामुळे मिळाला फायदा
शहरात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील भाजपाच्या प्रचारात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्यानंतर जळगाव शहराचे वातावरणच युतीमय झालेले दिसून आले. सुरेशदादा जैन यांचे वलय शहरात मोठ्या प्रमाणात असून, त्याचा फायदा भाजपाला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच भाजपा व शिवसेनेचे संघटन देखील शहरात राष्टÑवादी कॉँग्रेसपेक्षा चांगले असल्याने या संघटनांच्या जोरावर मतदान देखील चांगल्या प्रकारे काढण्यात आले. या ठिकाणी भाजपा राष्टÑवादीपेक्षा वरचढ ठरली.
विधानसभेला युतीलाच होणार फायदा ?
आता या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील सेना-भाजपाच्या युतीला होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या विद्यमान आमदार हे भाजपाचे आहेत. मात्र, या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे विधानसभेलाही सेना-भाजपाची युती झाल्यास ही जागा कोणत्या पक्षाला जाते हे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. युती झाल्यास ही जागा सेना किंवा भाजपाला गेली तरीही दोन्ही पक्षाना शहरात विजय मिळणे सोपे जाणार आहे. मात्र, युती न झाल्यास शहरात शिवसेना व भाजपातच खरी लढत पहायला मिळणार आहे.
सेना-भाजपाची युती झाल्यामुळे मनपातील तब्बल ७२ नगरसेवकांनी भाजपा उमेदवारासाठी शहरात काम केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरी जनमाणसावर असलेला करिष्मा या निवडणुकीत दिसून आला.
सुरेशदादा जैन यांची ताकद देखील भाजपा उमेदवाराचा मागे राहिल्याने उन्मेश पाटलांना फायदा झाला. राष्टÑवादी कॉँग्रेसची शहरात नसलेल्या संघटनाचा फटका राष्टÑवादीला बसला.

Web Title: BJP's strong alliance in Jalgaon too, voters rejected the plaintiff's congress in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.