भाजप हा आत्मघातकी पक्ष - संजय सावंत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:44 PM2018-07-22T12:44:41+5:302018-07-22T12:45:20+5:30

सुरेशदादांच्या मोठेपणामुळे मनसेचा महापौर होवू शकतो तर शिवसेनेचा का नाही?

BJP is suicide party - Sanjay Sawant's criticism | भाजप हा आत्मघातकी पक्ष - संजय सावंत यांची टीका

भाजप हा आत्मघातकी पक्ष - संजय सावंत यांची टीका

Next
ठळक मुद्दे‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्या गाफील न राहता काम करा

जळगाव : भाजपा हा आत्मघातकी पक्ष असून, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले होते. सुरेशदादा जैन यांनी आपल्या मनाचा मोठेपणा व शहराच्या विकासाच्या दृष्टीने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने आपले मुळ गुणसुत्र दाखवत राजकारण केले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वबळावर मनपा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले.
शहरातील खान्देश कॉम्प्लेक्स मधील कार्यालयात शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय सावंत हे बोलत होते. यावेळी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर रमेशदादा जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील तसेच शिवसेनेचे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य देखील उपस्थित होते.
‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे दाखवून द्या
विरोधी पक्षाकडून साम, दाम, दंडचा वापर होवून,पैशांचा पाऊस पाडला जाईल. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना कोणत्याही मतदाराला बळी पडू देवू नका. ‘सौ सोनार की तो, एक लोहार की’ हे विरोधी पक्षाला दाखवून द्या. बाळासाहेब ठाकरेयांच्या शिवसैनिकांनी निश्चिय केलातर काय करू शकतात हे त्यांना दाखवून द्या, ‘एक भुल कमल का फुल’ हे जळगावकरांना पटवून द्या असेही सावंत म्हणाले.
आता लढायची वेळ आहे, गाफील न राहता काम करा- आर.ओ. पाटील
माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील म्हणाले की, भाजपाची वृत्ती कशी आहे हे ओळखून या निवडणुकीत जोमानेकामकरावे. आता लढायची वेळ असून गाफील न राहता काम करा. माजी महापौर रमेशदादा जैन यांनी देखील निवडणुकीच्या आढावाबाबत माहिती देवून शिवसेनेचाच महापौर होणार असल्याची हमी यावेळी दिली. माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील यावेळी पदाधिकाºयांना मार्गदर्शन केले.
अस्तित्वाची लढाई समजणाºयांना
जनता अस्तित्व दाखविणार
मनपा निवडणूक ज्यांनी आपल्या अस्तित्वाची लढाई समजली आहे. त्यांना जळगावची जनता निवडणुकीनंतर आपले अस्तित्व दाखवून देईल असा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिला.
पत्रपरिषदेस सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, कि शोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, चिमणराव पाटील, माजी महापौर रमेशदादा जैन, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक जितेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते.
पत्रपरिषदेत सावंत म्हणाले की, निवडणुकीआधी युतीबाबत सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपाकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेची तयारी पूर्ण होती. त्यानुसार आम्ही मैदानात उतरले असून जळगावकर शिवसेनेला साथ देतील.
मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविणारच
संजय सावंत बैठकीत म्हणाले की, सुरेशदादा जैन यांनी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण घराघरात जायला हवे यासाठी यंदा खान्देश विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक न लढविता शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेनेवर टाकलेला हा विश्वास सर्व शिवसैनिकांनी सार्थ ठरवायचा असून, ३ आॅगस्टला मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवून जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचा पहिला महापौर बसविण्यासाठी मनापासून व पूर्ण ताकदीने प्रयत्न करावे, असे आवाहनही संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले.
कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम करावे !
खान्देश विकास आघाडीचे मनपात वर्चस्व आहे.मनसेचे केवळ ११ नगरसेवक असताना सर्वांना सोबत घेत शहराच्या विकासासाठी सुरेशदादा जैन यांनी मनसेचा महापौर मनपात बसविला. सुरेशदादा यांनी शिवसेनेचाच महापौर बनविण्याचा आता चंग मनाशी बांधला असून, आता रात्र-दिवस विसरुन पक्षासाठी वेळ काढून प्रत्येक प्रभागात शिवसेनेसाठी काम करा असे आवाहन संजय सावंत यांनी केले.
निष्ठावंतांना शिवसेना कधीही डावलत नाही
कोणत्याही निष्ठावंत उमेदवाराला डावलले नसून, शिवसेना निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष असल्याचेही सावंत म्हणाले. तसेच खान्देश विकास आघाडी ही देखील शिवसेनेची होती. सुरेशदादा जैन यांनी शहराचा विकासालाच महत्व देवून या आघाडीमध्ये इतर विचारांच्या उमेदवारांना घेतले होते. त्यामुळे खाविआ किंवा शिवसेना वेगवेगळे असे नव्हतेच. पक्षाचे चिन्ह आता घरोघरी जावे यासाठीच यंदा धनुष्यबाणावरच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही सावंत यांनी पत्रपरिषदेत दिली.

Web Title: BJP is suicide party - Sanjay Sawant's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.