रावेर-जळगावातून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:18 AM2019-03-20T11:18:26+5:302019-03-20T11:19:01+5:30

गिरीश महाजन : रक्षा खडसेंना उमेदवारी मिळावी; माझ्या कुटुंबातील कोणीही रिंगणात नसेल

Big competition for candidature from Raver-Jalgaon | रावेर-जळगावातून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा

रावेर-जळगावातून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा

googlenewsNext


जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी आमच्याकडे मोठी स्पर्धा असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात वेळ होत आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आपलीही इच्छा आहे. मात्र माझ्या कुटुंबातील कोणीही उमेदवार नसेल. लोकसभाच काय विधानसभेलाही घरातील कोणी उमेदवार नसेल असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले, पत्नी साधना महाजन या निवडणूक लढविणार अशी चर्चा पसरविली जात आहे. नगराध्यक्षपदापर्यंत ठिक आहे. विधान परिषदेच्या वेळीही आम्हाला आग्रह झाला होता, पक्षानेही तयारी दाखविली होती मात्र लोकसभा, विधानसभा अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये माझी पत्नी वा कुटुंबातील कोणीही आता तसेच भविष्यातही उमेदवार नसेल.
रक्षा खडसेंना उमेदवारी मिळावी
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात पक्षाकडून मोठी स्पर्धा आहे. रावेरमधून रक्षा खडसे, हरिभाऊ जावळे, अजय भोळे व अन्य काही जण इच्छूक आहे. मात्र रक्षा खडसे यांनाच उमेदवारी मिळावी अशी आपलीही इच्छा आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातून जास्त स्पर्धा आहे.
पोलीस अधिकारी साहेबराव पाटील, प्रकाश पाटील, उद्धवराव माळी, डॉ. संजय पाटील, करण पवार, एम.के. पाटील, विद्यमान खासदार ए.टी. पाटील, डी.एम. पाटील, आमदार स्मिता वाघ यांच्यासह अन्य काही जण इच्छूक आहेत. स्पर्धेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्टÑवादी, कॉँग्रेसचा सुपडासाफ
जळगाव, जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्टÑवादीचे अस्तित्व काय आहे? असा सवाल करून गिरीश महाजन म्हणाले. साधा एक नगरसेवक या पक्षांचा नाही. राष्टÑवादीचा एक आमदार आहे. आगामी निवडणुकांमध्ये सुपडासाफ होईल.
त्यामुळे या कुणाचे यश, कुणाचे अपयश अशा काही गप्पा मारू नये अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली.
भाजपात गुप्त बैठकांना वेग
जळगाव
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांची मंगळवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. बैठकीचा तपशिल मात्र बाहेर पडू देण्यात आला नाही. आमदार स्मिता वाघ या सर्व बैठकांना उपस्थित होत्या. महाजन यांनी दुपारी ५ वाजता कोर्ट चौकातील व शिवतीर्थ मैदानासमोरील आपल्या जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयात या बैठका घेतल्या. बैठकांना शहरातील नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. आमदार तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघातून इच्छूक उमेदवार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी उपस्थित होते. काही वेळाने दुसरे इच्छूक उमेदवार प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ हेदेखील या ठिकाणी आले. सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती. बैठकांबाबत काही नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘बैठक सहज होती’ अशीच उत्तरे दिली.
सुरेशदादा आमचेच... युती झाली महापालिकेत भविष्यात काय स्थिती असेल, याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मनपात युतीचीच सत्ता आहे. शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उमेदवारी असेल काय? असे विचारले असता सुरेशदादा जैन हे आमचेच असल्याचे ते म्हणाले. आगामी विधानसभेसाठीही युती असेल असे स्पष्ट करून जळगाव विधानसभेच्या जागेवर भाजपाने यश मिळविले आहे. त्यामुळे या जागेसाठी आम्ही आग्रही राहूू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Big competition for candidature from Raver-Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.