भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:03 PM2018-01-02T18:03:45+5:302018-01-02T18:08:21+5:30

सुरक्षेसाठी एस.टी.कर्मचाºयांचा अडीच तास चक्का जाम

Bhima-Korgaon violence: 9 vehicles in Amalner, two suspects detained | भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

Next
ठळक मुद्देपोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडलेएस.टी.च्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांचे चक्काजाम आंदोलनएस.टी.चालकाच्या डोक्याला मार

आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.२ : भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराचे पडसाद अमळनेरपर्यंत पोहोचले असून या ठिकाणी एस.टी.सह ९ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एसटी कर्मचाºयांनी सुरक्षेसाठी अडीच तास चक्का जाम आंदोलन केले.
भीमा-कोरेगाव येथील दगडफेकीचे पडसाद १ रोजी रात्री १० वाजता अमळनेरात उमटले. एक ट्रक धुळ्याकडे जात असताना अज्ञात तरुणाने हातातील लाकडी दांडक्याने पुढील काच फोडला तर रात्री दीड वाजेच्या सुमारास ५ ते ६ तरुणांनी तीन दुचाकींसह बसस्थानकात प्रवेश करीत तीन बसेसवर दगडफेक करीत नुकसान केले. एस.टी.महामंडळाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे सर्व दृश्य दिसत आहे. मात्र संशयितांची ओळख पटलेली नाही.

एस.टी.चालकाच्या डोक्याला मार
दरम्यान, सकाळी सर्व सुरळीत सुरू असताना अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर त्यापाठोपाठ चोपडा रस्त्यावर एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर काही वेळातच धुळे रस्त्यावर गॅस गोडाऊन जवळ ट्रक व एस.टी.ची तोडफोड करण्यात आली. यात धुळे आगाराचा चालक मोहन काशीनाथ पवार यांच्या डोक्यालाही मार लागला. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एस.टी.च्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांचे चक्काजाम आंदोलन
शहराच्या चारही बाजूने तोडफोड सुरू होताच संतप्त एस.टी.कर्मचाºयांनी प्रवाशी व एस.टी.सुरक्षेसाठी दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. या घटनेत अमळनेर आगाराच्या एम एच ०६, एस ८४९३, एम एच ४०, ९०२९, एम एच १४ बी टी १८५१, शिंदखेड्याच्या एन एच १४, बी टी २०८६ , व ९०७२ , नवापूर आगाराची एम एच १४ , बी टी २११४, शिरपूर आगाराची एम एच २० बी एल ९३७ या एस.टी.ची तर दोन खाजगी ट्रकची तोडफोड करून हजारो रुपयांचे नुकसान करण्यात आले.

पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले
दरम्यान, आर.के.नगर जवळ काही तरुण तोडफोड करून मोटार सायकल पळविल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना मिळाली. प्रमोद बागडे, किशोर पाटील, सुनील पाटील, प्रमोद पाटील, बापू साळुंखे या पोलिसांनी शेतांमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग केला. त्यात २ जण सापडले असून एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Bhima-Korgaon violence: 9 vehicles in Amalner, two suspects detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.