गरबा पाहण्यासाठी जाणारा बांबरूडचा तरुण अपघात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:44 PM2018-10-14T22:44:22+5:302018-10-14T22:47:07+5:30

मारुती व्हॅन व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा - भडगाव रस्त्यावर १३ रोजी रात्री घडली आहे.

Barkurad's young man, who went to see Garba, killed the young man | गरबा पाहण्यासाठी जाणारा बांबरूडचा तरुण अपघात ठार

गरबा पाहण्यासाठी जाणारा बांबरूडचा तरुण अपघात ठार

Next
ठळक मुद्देपाचोरा शहराजवळील दुर्दैवी घटनादोघे जण जात होते गरबा पाहण्यासाठीचारचाकी वाहनाने दिली समोरासमोर धडक

पाचोरा : मारुती व्हॅन व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा - भडगाव रस्त्यावर १३ रोजी रात्री घडली आहे.
दीनानाथ सुरेश गावडे (रा बांबरुड प्रभ) व राहुल दिलीप पिंगळे (रा. धुळे) हे दोघेजण बांबरुड येथून मोटारसायकलने पाचोरा येथे गरबा पहाण्यासाठी येत होते. या दरम्यान पाचोरा येथून भडगावकडे भरधाव वेगाने जाणारी मारुती व्हॅन (क्रमांक एमएच १९ बीव्ही ९८८२) ही जात असताना समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकलस्वार दीनानाथ गावडे हा जागीच ठार झाला तर राहुल पिंगळे गंभीर जखमी झाला. या दरम्यान मारुती व्हॅन चालक पसार झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Barkurad's young man, who went to see Garba, killed the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.