जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील कार्यालयात केळी फेकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 03:47 PM2018-06-11T15:47:05+5:302018-06-11T15:47:05+5:30

रावेर मधील केळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत चार दिवसात न मिळाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.

Banana will throw water from Minister of Water Resources Girish Mahajan in Jalgaon office | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील कार्यालयात केळी फेकणार

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील कार्यालयात केळी फेकणार

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी किसान सेलचा इशाराहेक्टरी एक लाख मदतीची मागणीअन्यथा महाजन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

जळगाव : रावेर मधील केळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत चार दिवसात न मिळाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.
नुकसान झालेल्या केळी पिकाच्या पाहणीसाठी रावेरला गेलेल्या जलसंपदामंत्री महाजन यांच्या दौºयातून सोपान पाटील यांना धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते. यासंदर्भात त्यांनी आपल म्हणणे जनतेसमोर आणण्यासाठी जळगाव येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली.
यावेळी सोपान पाटील म्हणाले की, गिरीश महाजन यांना त्यावेळी मी पालकमंत्री का आले नाही? असा प्रश्न विचारल्यामुळे महाजन यांनी संतापून मला दौºयात तुम्ही का आले असा उलट जाब विचारून बाहेर काढले. या अवमानाची पर्वा न करता शेतकºयांच्या प्रश्नाला प्राधान्य देत मी त्यांना पुन्हा प्रश्न विचारले, असेही ते म्हणाले. दरम्यान पालकमंत्री या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणे गरजेचे असताना ते या ठिकाणी आले नाही, पालकमंत्री नेहमीच जिल्ह्यासाठी वेळ देण्यात कमी पडतात, असेही सोपान पाटील म्हणाले.
अन्यथा महाजन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यात येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडेच मदत व पुर्नवसन खाते असल्याने त्यांचा दौरा महत्वाचा होता. परंतू आपल्याला खास मुख्यमंत्र्यांनी पाठविल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनीच पाठविल्यामुळे ते स्वत:च मदत जाहीर करू शकतात, त्यांनी हेक्टरी १ लाखांची मदत द्यावी, अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सोपान पाटील यांनी केली.

Web Title: Banana will throw water from Minister of Water Resources Girish Mahajan in Jalgaon office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.