जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:53 PM2018-02-08T16:53:44+5:302018-02-08T16:56:02+5:30

बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली.

assault on Watchman from Jalgaon police and business boy | जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण

जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्यावरून वादचेतन हा पोलिसाचा तर गोविंद हा व्यापा-याचा मुलगादोघांनी वॉचमन मधुकर श्रावण चौधरी यांना केली मारहाण

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८- बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. चेतन हा पोलिसाचा तर गोविंद हा व्यापा-याचा मुलगा आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मधुकर चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीत वॉचमन म्हणून कायम नोकरीला आहेत. सर्व दुकाने बंद झाल्यानंतर रात्री दहा वाजता बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केले जाते. चेतन व गोविंद हे दोन्ही जण बुधवारी रात्री साडे दहा वाजता बाजार समितीत आले. रात्री प्रवेश बंद असल्याने काही वेळ चौधरी यांनी गेट उघडले नाही. अलिशान कार असल्याने बाजार समितीचे पदाधिकारी किंवा व्यापारी असावेत म्हणून चौधरी यांनी गेट उघडले. यावेळी दोघांनी चौधरी यांना दमबाजी केली.

Web Title: assault on Watchman from Jalgaon police and business boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.