अंजली दमानियांविरूद्ध जारी केलेले अटक वॉरंटचे आदेश रावेर न्यायालयाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 6:51pm

रावेर : स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियेमुळे प्रवासात जंतूसंसर्ग होवू नये म्हणून दमानियांच्या वकिलांनी दाखल केला होता अर्ज

रावेर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी रावेर न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्याचे सुनावणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया या सतत अनुपस्थित राहिल्याने गुरूवारी रावेर न्यायालयाने अंजली दमानियांविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश पारीत केले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्यावर मुंबईच्या कोकीळाबेन धीरुभाई अंबानी रूग्णालयात स्तनाच्या कर्करोगाची दोनदा शस्त्रक्रिया केल्याने व त्यांच्या सासू हंसा दमानिया यांनाही लिलावती इस्पितळात दाखल केल्याने त्या रावेर न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित न राहू शकल्याचे परिस्थितीजन्य दस्तऐवज सादर करण्यात आले. त्यांचे वकील सुधीर कुलकर्णी व अॅड दिलीप बोरसे यांनी दाखल केलेल्या अर्जावरून शुक्रवारी (9 फेब्रुवारी) रावेर न्यायालयाने अटक वॉरंटचे जारी केलेले आदेश माघारी घेत असल्याचे आदेश नव्याने पारीत केले आहेत. 

काय आहे नेमके प्रकरण ? भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरूद्ध भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी रावेर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला होता. याप्रकरणी रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावण्यात आले होते.

रावेर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बदनामी केल्याप्रकरणी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांविरूद्ध रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात भादंवि कलम ४९९ व ५०० अन्वये दि २८ जून २०१६ रोजी फौजदारी खटला क्र ४०० /१६ दाखल केला होता. दरम्यान, अंजली दमानिया यांना रावेर न्यायालयाने प्रोशेस इश्यू करून दोनवेळा समन्स बजावले होते. दरम्यान, गत सात ते आठ सुनावणीसाठी त्या सतत अनुपस्थित राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात यावे, असा विनंती अर्ज भारतीय जनता पार्टीचे वकील चंद्रजित पाटील व तुषार माळी यांनी दाखल केला. या अर्जावर न्यायाधीश दिलीप मालवीय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना वाकोला (सांताक्रूझ) पोलिसांमार्फत अटक वॉरंट बजावण्यासंबंधी आदेश दिले होते.  

संबंधित

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती
रणांगणातील साम, दाम नीती
‘राजेंद्र गावित निवडून आल्यास सत्तेच्या माध्यमातून विकास शक्य’
Karnataka Floor Test : जनादेश आम्हाला, बहुमताअभावी राजीनामा
दोडामार्ग नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल

जळगाव कडून आणखी

चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित
जळगावात महिलेने पाठलाग करुन पकडले चोरट्यांना
डाळीची विल्हेवाट लावणारा सूत्रधार जळगाव पोलिसांच्या जाळ्यात
वेबसाईट हॅक करुन जळगावातील ठगाने घातला गंडा
या कारणामुळे घडले भादली हत्याकांड

आणखी वाचा