अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने आधी केले श्रमदान, नंतर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 03:10 PM2019-04-23T15:10:53+5:302019-04-23T15:12:44+5:30

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने एकजूट करून मंगळवारी सकाळी श्रमदान करून नंतर दुपारी सव्वादोन वाजता वाजंत्री वाजवत एकाचवेळी साडे तीनशे मतदार मतदानाला निघाले. लोकसभा निवडणुकीच्य माध्यमातून गावकऱ्यांच्या एकीचे प्रदर्शन झाले.

Anandre village in Amalner taluka has done Shramdan, then vote | अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने आधी केले श्रमदान, नंतर मतदान

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने आधी केले श्रमदान, नंतर मतदान

Next
ठळक मुद्देआनोरे गावाने एकजूट दाखवत केले एकत्र मतदानवॉटर कप स्पर्धेत गावाने घेतला आहे सहभागगावात दररोज सकाळी सकाळी होते श्रमदान अन् रात्री ग्रामसभा‘करू या दुष्काळाशी दोन हात’ ग्रामस्थांनी केलाय संकल्प

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने एकजूट करून मंगळवारी सकाळी श्रमदान करून नंतर दुपारी सव्वादोन वाजता वाजंत्री वाजवत एकाचवेळी साडे तीनशे मतदार मतदानाला निघाले. लोकसभा निवडणुकीच्य माध्यमातून गावकऱ्यांच्या एकीचे प्रदर्शन झाले.
‘आधी केले श्रमदान आता करू मतदान’, ‘आमच्या गावाचा एकाच पक्ष पाण्यावर लक्ष’, ‘मिलके बोलो एकसाथ’, ‘दुष्काळाशी दोन हात’, अशा विविध घोषणा दिल्या व मतदानाला निघाले. सकाळपासून आनोरेचे एकही मतदान झाले नव्हते. मात्र आधी श्रमदान करण्याविषयी चर्चा झाली.
अमळनेर शहराच्या पश्चिमेला १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात चारशेवर मतदार आहेत. येथे १०० टक्के शोषखड्डे तयार झाले आहेत. या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. दररोज सकाळी श्रमदान केले जाते. यात पावसाळ्यात पाणी अडवले जावे यासाठी जंगलात चर खोदणे, चारी तयार करणे, वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे अशी कामे नित्यनेमाने केली जातात. सकाळी श्रमदान झाल्यानंतर दररोज रात्री ग्रामसभा होते. यात वॉटर कप स्पर्धेतील सहभागाबद्दल प्राधान्याने चर्चा होते.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने गावकऱ्यांनी पुनश्च एकतेचे दर्शन घडवले. सकाळी कोणीही मतदान करता, आधी सर्वांनी श्रमदान करावे आणि नंतरच निवडणुकीसाठी मतदान करावे, असे ठरले. त्यानुसार संपूर्ण गावाने श्रमदान केले आणि दुपारी सव्वादोनला ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली, ती थेट जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जावून धडकली. मतदान केंद्राच्या ठिकाणीही खोली क्रमांकानुसार रांगेत उभे राहून शांततेने मतदान केले.

Web Title: Anandre village in Amalner taluka has done Shramdan, then vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.