अमळनेरातील १८ अतिक्रमित दुकाने पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:35 AM2017-08-18T11:35:42+5:302017-08-18T11:38:00+5:30

शैक्षणिक उद्देशाने दिलेल्या जागेवर बांधले होते दुकाने

Ambulance 18 infiltrated shops were destroyed | अमळनेरातील १८ अतिक्रमित दुकाने पाडली

अमळनेरातील १८ अतिक्रमित दुकाने पाडली

Next
ठळक मुद्देखंडपीठाच्या आदेशान्वये कारवाईसकाळी साडेसात वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरवातशांततेत कारवाई सुरू
नलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव , दि...१८ : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धुळे रस्त्यावरील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेली १८ बेकायदेशीर दुकाने पाडण्यास नगरपालिकेने पाडण्यास आज सकाळपासून सुरवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.शांततेत ही कारवाई सुरू होती. शैक्षणिक उद्देशासाठी दिलेल्या जागेवर व्यापारी संकुल बांधले म्हणून माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल २६ जुलै १७ रोजी लागला. त्यात खंडपीठाने ही दुकाने एका महिन्याच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात नगरपालिकेने संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या. १८ रोजी सकाळी साडेसात वाजता नगरपरिषदेने दोन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमित दुकाने पडण्यास सुरुवात केली. सकाळी-सकाळी सुरू झालेल्या या कारवाईमुळे बघ्यांची गर्दी झालेली होती. पोलीस येण्यापूर्वीच पालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. यावेळी मुख्याधिकारी उत्कर्ष गुटे, संजय चौधरी, बांधकाम अभियंता प्रवीण जोंधळे, संजय पाटील, युवराज चव्हाण , संतोष बिºहाडे, दिलीप सारजे, शेखर देशमुख, महेश जोशी, अविनाश संदनशिव, ज्ञानेश्वर संदनशिव, प्रसाद शर्मा, पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक ढोबळे, उपनिरीक्षक सुरेश मोर, डॉ विलास महाजन, यांच्यासह अग्निशामक दल रुग्णवाहिका, एक आरसीपी प्लाटून, ११ पोलीस दोन महिला पोलीस उपस्थित होते. शांततेत ही कारवाई सुरू होती.

Web Title: Ambulance 18 infiltrated shops were destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.