अमळनेर तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्यात शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:14 PM2019-06-19T23:14:38+5:302019-06-19T23:15:59+5:30

एका कामावरून अमळनेर तहसीलदार ज्योती देवरे व जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली असून, दोघांनी परस्परांवर अपमानास्पद शब्द वापरल्याचे आरोप केले आहेत

Amalner tehsiladar and Zilla Parishad member's literal flick | अमळनेर तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्यात शाब्दिक चकमक

अमळनेर तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्यात शाब्दिक चकमक

Next
ठळक मुद्देएकमेकांवर अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपजि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आरोपतहसीलदार ज्योती देवरे म्हणतात, किसान योजनेची बैठक सुरू असताना निर्माण केला अडथळा अन् केला पाणउतारा

अमळनेर, जि.जळगाव : एका कामावरून तहसीलदार ज्योती देवरे व जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली असून, दोघांनी परस्परांवर अपमानास्पद शब्द वापरल्याचे आरोप केले आहेत
जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मी, शेतकऱ्यांच्या कामासाठी तहसीलदार देवरे यांना फोन लावला. त्यांनी तो उचलला नाही म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेली असता तेव्हा त्यांनी अरेरावी केली. उद्धट वागणूक दिली. मी यासंदर्भात प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे. १५ दिवसात या तहसीलदारावर कारवाई न केल्यास तहसील कार्यालयाबाहेर उपोषणास बसण्याचा इशाराही जयश्री पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की, दुपारी साडेअकरा वाजता पंतप्रधान किसान योजनेची बैठक तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासोबत सुरू होती. तेव्हा जयश्री पाटील यांनी जोराने दार लोटून दालनात प्रवेश केला व लाज वाटते का तुम्हाला? हजार वेळा फोन करून तुम्ही आमचे फोन घेत नाहीत म्हणून पाणउतारा केला. तुम्हाला भान आहे का? अशी निर्भत्सना केली आणि पंतप्रधान किसान योजनेसारख्या महत्वाच्या बैठकीत अडथळा निर्माण केला आहे. याबाबत मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे, असे सांगितले.

Web Title: Amalner tehsiladar and Zilla Parishad member's literal flick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.